बदलापूर प्रकरण निषेधार्थ पुण्यात सुप्रिया सुळे यांचे आंदोलकांना मार्गदर्शन

[ad_1]

Supriya Sule
बदलापूर चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ने निषेध आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाकडून हे निषेध आंदोलन पुण्यात स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार स्वतः या आंदोलनात सहभागी झाले.

या वेळी त्यांनी तोंडाला काळा मास्क लावला होता आणि दंडावर काळी पट्टी बांधली होती. पुण्यात जोराचा पाऊस सुरु असताना देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. 

 

त्या म्हणाल्या, ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. मुलींच्या सुरक्षतेसाठी आपल्याला मोठे काम करायचे आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी गावात, वस्तीत, वाडीत जाऊन पालकांना धीर द्यायचे आहे. सत्तेसाठी लोकांनी भाष्य केले की, बदलापूरच्या आंदोलनात बाहेरून आलेले लोक होते. मी म्हणते, ते कुठलेही असो भारताची जनता आहे. आणि भारताच्या लेकीसाठी लढायला पुढे आले.सरकारने याची नोंद घ्यावी.

ते कुणी बाहेरचे नसून बदलापूरची संतप्त जनता होती. अखेर हे सत्य बाहेर आलेच.या भाष्यवरून सरकारची विचारसरणी काय आहे हे उघड झाले. अशी घणाघात टीका या वेळी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुण्यात झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला दोन महिन्यांतच फाशी दिली. असं असेल तर आपण सर्व जाहीरपणे मुख्यमंत्रीच्या सत्काराला जाऊ.प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जात आहे.अशी असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलेली नाही. असं म्हणत त्यांनी राज्यसरकारवर टोला लगावला. 

Edited By – Priya Dixit  

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top