धक्कादायक! बीडच्या डॉक्टर तरुणीवर जळगाव येथिल परिचारकाकडून अत्याचार


हायलाइट्स:

  • लग्नाचे आमीष दाखवून एका डॉक्टर तरुणीवर परिचारकाचा ५ वर्षे अत्याचार.
  • परिचारकाविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल.
  • गुन्हा दाखल झाल्यानतंर परिचारक संपत मल्हाड हा बेपत्ता झाला आहे.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने बीड जिल्ह्यीत राहणाऱ्या व सध्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीवर लग्नाचे आमीष देऊन पाच वर्षे अत्याचार केला. विशेष म्हणजे या परिचारकाचे लग्न झाल्यानतंरही तरुणीने विरोध करुन देखील तिला जळगावात आणून हातपाय बांधून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर पीडितेने दिलेल्या फिर्यादीनतंर परिचारकाविरोधा जळगाव एमआयडीसी पोलिसात आज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संपत लक्ष्मण मल्हाड (मुळ रा. दरिबडची, ता. जत, जि. सांगली) असे परिचारकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानतंर परिचारक संपत बेपत्ता झाला आहे. (a young doctor from beed was raped by a male nurse in jalgaon)

क्लिक करा आणि वाचा- वादळ, विजा आणि पुराचाही धोका, प्रशासनाने दिला इशारा

या संपातजनक घटनेची समोर आलेली माहीती अशी की, पिडीत तरुणी उस्मानाबाद येथे नर्सिंग कॉलेजला नोकरीस असताना प्रशिक्षणासाठी सांगली येथे गेली होती. या दरम्या तीची संपतशी ओळख झाली. त्यावेळी संपतने तीला लग्नाचे आमीष देवून तीच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानतंर संपतने अनेकवेळा तीच्याकडून पैसे देखील घेतले. दरम्यान, अत्याचारातून तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तीला जळगावात बोलावून पाळधी येथील एका रुग्णालयात गर्भपात करवून घेतला. यानंतर मागील वर्षी मार्च मध्ये संपतने लग्न केल्यानतंर या पिडीतेने संबद तोडले.

क्लिक करा आणि वाचा- जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू

लग्न झाल्यानतंर देखील संपतने तीच्या गावी जाऊन प्रेमसंबधाबाबत लोकांना सांगण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन तरुणी त्याच्या सोबत संपर्कात राहत होती. संपत तीला भेटण्यासाठी तगादा लावत होता. सप्टेबर २०२० मध्ये औरंगाबाद येथे बोलावून घेत पुन्हा अत्याचार केले. यानंतर ६ सप्टेबर २०२१ रोजी संपतने तरुणीस जळगावात बोलावून घेतले. पांडे डेअरी चौकातील मैत्रीणीच्या रुमवर घेऊन गेला. तेथे त्याने थेट हात-पाय बांधून तीच्यावर अत्याचार केले. तीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यानंतर एका खासगी वाहनातून तरुणीस बीड येथे मुळगावी सोडून आला. अखेर संपतने केलेल्या अत्याचारास वैतागलेल्या तरुणीने जळगावात एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार संपतच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली महत्वाची मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: