पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारे अप्राकृतिक संबंध क्रूर गुन्हा : सर्वोच्च न्यायालय


हायलाइट्स:

  • हुंड्याची मागणी करत पत्नीचा छळ
  • पत्नीचे खासगी फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर लीक केल्याचा आरोप
  • असे आरोपी तुरुंगातच बरे, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

नवी दिल्ली : पत्नीसोबत जबरदस्तीनं अप्राकृतिक संबंध हा क्रूर गुन्हा आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केलीय. अशा प्रकारचे संबंध पत्नीच्या आत्महत्येचं कारण ठरत असेल तर अशा प्रकरणांतील आरोपी तुरुंगातच राहिलेले बरे, अशी टिप्पणीही न्यायालयानं केलीय.

आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि बलात्काराचे आरोप असलेल्या एका आरोपीनं जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सोमवारी या प्रकरणात न्यायालयानं अतिशय महत्त्वाची टिप्पणी करतानाच आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय.

गेल्या दोन वर्षांपासून हा प्रदीप नावाचा हा आरोपी तुरुंगात आहे. २०१८ मध्ये हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील पीडितेच्या भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम १४८, १४९, ३२३, ३७७ आणि ३०६ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.

सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्यासहीत न्यायमूर्ती सूर्य कांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. पत्नीच्या कुटुंबानं हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यानं पत्नीसोबत अप्राकृतिक संबंध प्रस्थापित करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप प्रदीपवर आहे.

Indian Army: ​उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवादी जिवंत सुरक्षादलाच्या हाती, १९ वर्षीय बाबर पाकिस्तानी नागरिक
दिल्ली हिंसाचार : सीसीटीव्ही फोडणं हादेखील कटाचा भाग, हायकोर्टाची टिप्पणी

पत्नीचे खासगी फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर

कलम ३७७ (बलात्कार) हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. आरोपी पती चौकशी दरम्यान कोणत्याही उदारता दाखवण्याच्या पात्रतेचा नाही. पतीकडून करण्यात आलेली हुंड्याची मागणी पूर्ण करण्यात आली नाही तेव्हा तिचा छळ सुरू करण्यात आला. पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक करण्यात आले. तसंच तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वात गंभीर बाब म्हणजे पतीनं पत्नीसोबत अप्राकृतिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर पीडितेनं आत्महत्या केली. अशावेळी पती कोणत्याही प्रकारे दया दाखवण्याच्या पात्रतेचा नाही. कारण हे एक निंदनीय कृत्य आहे.

यावर, याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून ही व्यक्ती सरकारी कर्मचारी असून तिला जामीन मिळाला नाही तर त्याची नोकरी जाण्याची शक्यता असल्याचं कोर्टासमोर सांगितलं. यावर, ‘अशा लोकांनी नोकरी गमावणं हेच योग्य राहील, तुम्ही तुरुंगातच राहणं योग्य आहे’ अशी टिप्पणी करत न्यायालयानं आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Punjab Elections: नवज्योत सिंह सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Kanhaiya Kumar: कन्हय्या कुमार यांची काँग्रेस एन्टी, मनिष तिवारींचा आपल्याच पक्षावर निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: