वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वीच अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सच्या या अमेरिकेतील वृत्तपत्राचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आला होता. ‘पृथ्वीवरील शेवटची सर्वात मोठी आशा’ या मथळ्याखाली पंतप्रधान मोदींचा फोटो होता. या स्क्रिनशॉटवर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. न्यूयॉर्क टाइम्सने या व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉटवर ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्रासह व्हायरल करण्यात येणारा वृत्तपत्राच्या बातमीचा स्क्रीनशॉट हा पूर्णपणे खोटा आहे. फोटोशॉप करण्यात आलेला फोटो शेअर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करणे म्हणजे खोटी माहिती आणि भ्रम निर्माण करण्यासारखा आहे. सत्यावर आधारित पत्रकारितेची आवश्यकता असताना अशावेळी ही महत्त्वाची गोष्ट आहे. या ट्विटमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडित असलेल्या बातमीची लिंक ही दिली आहे.
UNGA: करोना, लसीकरण, दहशतवाद…पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे
अफगाणिस्तानच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींचे भाष्य, म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सच्या कथित वृत्ताचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. काही फॅक्ट चेक संकेतस्थळांनीदेखील हा स्क्रीनशॉट खोटा असून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावरही अनेकांनी या स्क्रीनशॉटमधील चुका दाखवत आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे त्या दिवशीचे पहिले पानही सोशल मीडियावर शेअर केले होते.
Source link
Like this:
Like Loading...