charanjit singh channi : ‘सिद्धूंशी मी फोनवर बोललो, आम्ही मिळून मतभेद दूर…’


चंदिगडः पंजाब काँग्रेसमधील कलह मिटण्याची चिन्ह दिसत नाहीए. आता कहल दूर करण्यासाठी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर आम्ही एकत्र बैठक घेऊन चर्चा करू, अशी माहिती मुख्यमंत्री चन्नी यांनी दिली आहे. सिद्धूंसोबत आपलं बोलणं झालं आहे आणि लवकरच सर्व मुद्दे सोडवले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री चन्नी यांनी व्यक्त केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर चन्नी यांनी माहिती दिली. “सिद्धूंशी आपण आज फोनवर बोललो. सरकार पक्षाच्या विचारधारेचे पालन करते. सिद्धू यांच्याशी बोलण्यासाठी परगट सिंग यांना पाठवण्यात आले. सिद्धू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर एकत्रित बसून बैठकीत चर्चा केली जाईल. जे शक्य आहे ते केले जाईल, असं मुख्यमंत्री चन्नी यांनी स्पष्ट केलं.

प्रदेशाध्यक्ष पक्षाचे प्रमुख असतात. त्यांना निर्धारानने आपलं म्हणणं पुढे न्यायचं असतं. पंजाब काँग्रेसमध्ये कुठलाही कलह नाही. पंजाबच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण मागे हटणार नाही, असं मुख्यमंत्री चन्नी म्हणाले.

navjot singh sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा का

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा सिद्धूंनी मंगळवारी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी आज एक व्हिडिओ जारी करत संदेश दिला. हक्काची आणि सत्याची लढाई अखेरपर्यंत सुरू राहील. तसंच या व्हिडिओतून मुख्यमंत्री चन्नी यांच्याद्वारे करण्यात येत असलेल्या नियुक्त्यांवर सिद्धूंनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खासकरून पोलिस महासंचालक आणि महाधिवक्त्यांच्या नियुक्तीचा उल्लेखही केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: