पावसाचा जोर आणि उजनीचा विसर्ग वाढला, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवून गावकऱ्यांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे:- प्रणिती शिंदे
सोमवार / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ ऑगस्ट २०२४ – लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी माचनुर ता.मंगळवेढा ,पुळुज ता.पंढरपूर या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच माचणुर बेगमपुर येथील जुना पुल, आंबेचिंचोली बंधारा, पंढरपूर येथील जुना दगडी पूल येथे भेट देऊन भीमा नदी पात्राची पाहणी केली उजणीतून पाणी सोडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी काहीही अडचण असल्यास संपर्क साधावे असे आवाहन केले. तसेच प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था करावी आणि नागरीकांना आवश्यक ते सुविधा पुरवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या सह इतर खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.यावेळी मान्यवर नेते मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------