सांगा वागायचं कसं ? ……

    सांगा वागायचं कसं ? ...... 

अति बुद्धिमान,अति श्रीमंत वा अति उच्च
सत्ताधीश असो पण तो कसा वागतो
कसं वागवतो कसं बोलतो हे महत्वाचे असते ,
निव्वळ तोंडसुख घेणं
आपल्या मुखातून गटारगंगा वाहात ठेवणं
मी म्हणेल तीच पूर्व यात अपूर्वाई समजणं
इतरांना मूर्ख समजणं
हे कशाचे लक्षण समजायचे ?
केवळ सत्ता पैसा गुंडगिरी आहे म्हणून
त्यांची आरती ओवाळणे
हे कोणत्या संस्कृतीत बसते !
सांगा आता आपण वागायचं कसं?

गोफणगुंडा ! आजचे वास्तव ………

माणूस असूनही पशूला लाजवतोत आम्ही
बुद्धी असूनही विकृत जगतोत आम्ही !!

स्वार्थ अन सुखासाठी धडपडतोत आम्ही
सार्वजनिक दायित्व टाळतोत आम्ही !!

स्वतःला शहाणे समजतोत आम्ही
इतरांशी घृणास्पंद वागतोत आम्ही !!

स्वप्नांचे आकाश फूलवतोत आम्ही
सावलीच्याच पाठीशी धावतोत आम्ही !!

उक्ति अन कृतीत अंतर ठेवतो आम्ही
फुकटचेच लाटत खिसे भरतोत आम्ही !!

नाही लाज नाही आब्रू निलाजरे आम्ही
तरीही समजतोत कर्तुत्व संपन्न आम्ही !!

आरोप चौकशी कोळून पितोत आम्ही
जिरवतताना कायदा विकत घेतो आम्ही !!

तत्व सत्व सत्य फक्त बोलतोत आम्ही
रस्ते अनैतिक स्वार्थाचेच सौदागर आम्ही !!

कांही करा कोठे बदलतोत आम्ही
जसे जगलोत तसेच जाणार आम्ही !!

                सुप्रभात 

“मनांत असेल तरच रुजते नसेल तर ते जागेवरच कुजते “

आनंद कोठडीया,जेऊर – ९४०४६९२२००

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: