घरनिकी येथे बेकायदा दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; देशी दारू जप्त

घरनिकी येथे बेकायदा दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३,६०० रुपयांची देशी दारू जप्त

मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई; शांतीनाथ लेंडवेवर गुन्हा दाखल

घरनिकी येथे बेकायदा दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३,६०० रुपयांची देशी दारू जप्त

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथे सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत ३ हजार ६०० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी शांतीनाथ सिद्धेश्वर लेंडवे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार सुखदेव गंगणे हे ४ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-मारापूर मार्गावर गस्त घालत होते. यावेळी घरनिकी येथील आरोपी शांतीनाथ लेंडवे हा स्वतःच्या पत्राशेडच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आणि महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला.

तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या बेकायदा दारू अड्ड्यांविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शहरातील अधिकृत दुकाने नियमानुसार ठरलेल्या वेळेत बंद होत असताना, काही बेकायदेशीर दारू अड्डे रात्री उशिरा पर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे अशा अड्ड्यांवर कोणाचे नियंत्रण आहे का,असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलिस प्रशासनाने अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करून तालुका दारूमुक्त करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Back To Top