जागतिक पर्यावरण दिनानिमित्त RPF रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश,RPF रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत RPF रेल्वे पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अँड.सारिका नितीन गांधी व नितीन पदमकुमार गांधी यांना विशेष मान देण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त RPF रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण
RPF चे श्री.जाधव यांच्या हस्ते आयोजित या कार्यक्रमात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांचा विचार करता वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान अँड.सारिका गांधी आणि नितीन गांधी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. तसेच RPF प्रशासनाने दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी श्री. जाधव व रेल्वे पोलीस स्टेशन प्रशासनाचे आभार मानले.
वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होत असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

