UP Police: उत्तर प्रदेशात पोलिसांच्या मारहाणीनंतर व्यावसायिकाचा मृत्यू, आरोपी फरार


हायलाइट्स:

  • पोलिसांकडून मारहाणीनंतर ३६ वर्षीय व्यापारी मनीष गुप्ता यांचा मृत्यू
  • मृत्यूनंतर गुरुवारी ५३ तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार
  • सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

कानपूर, उत्तर प्रदेश : आपल्या मित्रांसोबत गोरखपूरला फिरण्यासाठी दाखल झालेल्या कानपूरचे ३६ वर्षीय व्यापारी मनीष गुप्ता यांचा पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीनंतर सोमवारी मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तब्बल ५३ तासांनी गुरुवारी पहाटेच गुप्ता यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. यामुळे उत्तर प्रदेशातील तणावात वाढ झाली असून दोषींवर कारवाईसाठी सरकारवरही दबाव वाढल्याचं दिसून येतंय.

सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणात रामगढताल पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकासहीत सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जगत नारायण सिंह, चौकी प्रभारी अक्षय मिश्र आणि उपनिरीक्षक विजय यादव यासहीत तीन अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामगढताल पोलीस स्टेशनमध्ये नव्या पोलीस निरीक्षकाची नेमणूकही करण्यात आलीय. तसंच या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, या प्रकरणातील सर्व आरोपी अजूनही फरार आहेत.

PM Poshan Scheme: मध्यान्ह भोजन आता ‘पीएम पोषण’, ११.८० कोटी विद्यार्थ्यांना लाभ
‘न्यायालयाकडून शिक्षेचा अधिकार हिरावता येत नाही’

काय घडलं त्या दिवशी?

गोरखपूरच्या रामगढताल भागात स्थित असलेल्या एका हॉटेलमध्ये मनीष गुप्ता प्रदीप चौहान आणि हरदीप सिंह या मित्रांसोबत दाखल झाले होते. हॉटेलमध्ये चौकशीसाठी दाखल झालेल्या पोलिसांसोबत रात्री १२.३० वाजल्याच्या सुमारास गुप्ता यांचा काही कारणावरून वाद झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे गुप्ता यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. मारहाणीमुळे गुप्ता बेशुद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अगोदर एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. यानंतर मनीष गुप्ता यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही पोलिसांनी दीड तासांपर्यंत गुप्ता यांचा मृतदेह लपवून ठेवल्याचं समोर येतंय.

मनीष गुप्ता यांच्या पत्नी मीनाक्षी गुप्ता यांच्याकडून न्याय मिळण्याची मागणी करण्यात आलीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची मागणी मीनाक्षी यांनी केलीय. गुरुवारी सकाळी मोठी पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करून कुटुंबीयांच्या उपस्थितीत मृतदेह भैरो घाटावर आणण्यात आला. इथे मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

३६ वर्षीय मनीष गुप्ता एका रियल इस्टेट कंपनीत काम करत होते. गुप्ता यांच्यावर वडील, पत्नी मीनाक्षी आणि मुलगा अभिराज (४ वर्ष) यांची जबाबदारी होती. ‘मनीष गुप्ता यांचा गुन्हा काय होता?’ असा प्रश्न मीनाक्षी यांनी विचारला आहे.

India Afghanistan: काबूलची विमानसेवा सुरू करा, तालिबानचं भारताला पत्र
Sputnik V: ‘स्पुटनिक व्ही’ला रुग्णालयांचा नकार, कारणही जाणून घ्या…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: