पंढरपूर एमआयडिसी ला विरोध करणारे हे सरंजामशाही प्रवृत्तीचे

  • पंढरपूर एमआयडिसी ला विरोध करणारे हे सरंजामशाही प्रवृत्तीचे…
  • काही मुठभर सरंजामशाही प्रवृत्तीचे लोकच हा विरोध करीत आहेत

पंढरपूर / प्रतिनिधी : पंढरपूरात एम.आय.डि.सी असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आता स्थानिक आमदारांच्या प्रयत्नातून यशस्वी होईल असे वाटत असताना, काही मुठभर सरंजामशाही प्रवृत्तीचे लोकच हा विरोध करीत आहेत.

स्थानिक लोकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवनवीन संधी या एमआयडिसीच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत. लघु उद्योगांना अत्यल्प दरात वीज,पाणी,रस्ते,गाळे ,विविध करांमधून सवलती, व्यवसायास पुरक दळणवळणाची साधने उपलब्ध होतील. पंढरपुरातील स्थानिकांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी संधी मिळेल. परंतू काही सरंजामशाही प्रवृत्तीचे लोक एमआयडिसी ला विरोध करीत आहेत. संबंधित लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही वृत्ती अजूनही गेलेली दिसत नाही. बारा हजार बागायत क्षेत्रात बारा हजार शेत मजूर काम करतात,असे छाती ठोकून सांगत आहेत. बारा हजार शेत मजूरांनी पिढ्यांन पिढ्या शेत मजूरीच करुन गुलामगिरीचे जीवन व्यथित करावे, अशाच मानसिक प्रवृत्तीतून पंढरपूर एमआयडिसी ला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक बेरोजगार व शेत मजूरांना अर्थिक विषमतेच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एमआयडिसी अत्यंत गरजेची आहे, असे प्रतिपादन बसपाचे जिल्हा महासचिव रवी सर्वगोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: