navjot singh sidhu : सिद्धू वठणीवर! काँग्रेस हायकमांडच्या दट्ट्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चेस तयार


चंदिगडः पंजाब काँग्रेसमधील कलह थांबण्याची चिन्ह दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी यांनी अचानक दिलेल्या पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याने खळबळ उडाली. पंजाब निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यापासून दिल्लीत काँग्रेस हायकमांडपासून ते पंजाबमधील पक्षाच्या नेत्यांपर्यंत प्रत्येकजण त्यांचं मन वळवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. याला यश येताना दिसतंय.

मुख्यमंत्री चन्नी यांची भेट घेणार

काँग्रेस हायकमांडने आडमुठ्या सिद्धूंना दट्ट्या दिल्यानंतर ते वठणीवर येत असल्याचं दिसतंय. सिद्धू पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेणार आहेत. कोणाशीही बोलायला तयार नसलेले सिद्धू मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी बोलण्यास तयार झाले आहेत. मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ संपुष्टात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सिद्धूंना फोन केला आणि मिळून सर्व प्रश्न सोडवू असं सांगत चर्चेची ऑफर दिली. ही ऑफर सिद्धूंनी स्वीकारली आहे. सिद्धू यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावलं आहे, त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. मी आज दुपारी तीन वाजता पंजाब भवन, चंदीगड येथे पोहचेन. कोणत्याही चर्चेसाठी त्यांचं स्वागत आहे, सिद्धूंनी ट्विटमध्ये म्हटलंय.

Amarinder Singh: गृहमंत्री अमित शहांच्या भेटीवर कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं स्पष्टीकरण

हायकमांड सिद्धूपासून अंतर राखले

हायकमांड सिद्धूंशी चर्चा करण्यास तयार नाही. सिद्धूंच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या काँग्रेस हायकमांडने आता त्यांचापासून अंतर राखले आहे. यामुळे सिद्धूंना पर्याय उरला नसल्याचं बोललं जात आहे.परगट सिंग यांच्यासह अनेक नेत्यांनी बुधवारी सिद्धूंची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.

Punjab Congress: ‘कॅप्टन’च्या ‘होम मिनिस्टर’कडे सोपवली जाणार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: