Manish Gupta Murder Case: यूपीत व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; योगींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट


हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
  • पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न
  • मुलाच्या शिक्षणाचा खर्च तसंच पत्नीला नोकरी देण्याचं आश्वासन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात पोलिसांकडून व्यावसायिकाची हत्या प्रकरण समोर आल्यानंतर कायदे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. याच दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर कानपूरचे व्यावसायिक मनीष गुप्ता यांचा सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मनीष यांची पत्नी मीनाक्षी गुप्ता यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय.

मुख्यमंत्र्यांनी पालकाप्रमाणे आपलं म्हणणं ऐकून घेतलं आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचं यानंतर मीनाक्षी गुप्ता यांनी म्हटलंय. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मीनाक्षी यांच्या मुलाच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार असल्याची ग्वाही दिलीय. तसंच मीनाक्षी यांना सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय. मीनाक्षी गुप्ता यांना विकास प्राधिकरणात ओएसडीची नोकरी देण्यात येणार आहे. सोबतच, मदत निधी १० लाख रुपयांनी वाढवून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून आपण संतुष्ट असल्याचं मीनाक्षी गुप्ता यांनी म्हटलंय.

UP Police: उत्तर प्रदेशात पोलिसांच्या मारहाणीनंतर व्यावसायिकाचा मृत्यू, आरोपी फरार
‘न्यायालयाकडून शिक्षेचा अधिकार हिरावता येत नाही’

मनीष गुप्ता हत्या प्रकरणाचा तपास गोरखपूरमधून कानपूरला हलवण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलीय. सोबतच, दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्याअगोदर माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. तसंच सपाकडून पीडित कुटुंबाला २० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

गोरखपूरच्या रामगढताल भागात स्थित असलेल्या एका हॉटेलमध्ये मनीष गुप्ता प्रदीप चौहान आणि हरदीप सिंह या मित्रांसोबत दाखल झाले होते. हॉटेलमध्ये चौकशीसाठी दाखल झालेल्या पोलिसांसोबत रात्री १२.३० वाजल्याच्या सुमारास गुप्ता यांचा काही कारणावरून वाद झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे गुप्ता यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. मारहाणीमुळे गुप्ता बेशुद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अगोदर एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. यानंतर मनीष गुप्ता यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही पोलिसांनी दीड तासांपर्यंत गुप्ता यांचा मृतदेह लपवून ठेवल्याचं समोर येतंय.

Punjab Congress: ‘कॅप्टन’च्या ‘होम मिनिस्टर’कडे सोपवली जाणार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं?
Amarinder Singh: गृहमंत्री अमित शहांच्या भेटीवर कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं स्पष्टीकरण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: