… अखेर बीसीसीआयने केला मोठा खुलासा, विराट कोहलीविरुद्ध कोणत्या खेळाडूंनी तक्रार केली सांगतिलं


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी संबंधित अनेक वाद समोर येत आहेत. भारतीय संघातील खेळाडूंमध्ये कोहलीविरोधात नाराजीचे दावे केले जात आहेत. तसेच काही वरिष्ठ खेळाडू विराटच्या वागण्यावर नाराज आहेत आणि त्यांनी बीसीसीआयकडे याबाबत तक्रारही केल्याचे वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. असेही म्हटले गेले आहे की, याच कारणामुळे बीसीसीआयने कोहलीकडून टी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेतले. सतत अशा बातम्यांनंतर आता बीसीसीआयच्या बाजूने पहिली प्रतिक्रिया आली आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या प्रकरणी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, माध्यमांनी काहीही लिहिण्यापासून परावृत्त झाले पाहिजे. कोहलीबद्दल कोणत्याही खेळाडूने बीसीसीआयकडे लेखी किंवा तोंडी तक्रार केलेली नाही. बीसीसीआय प्रत्येक खोट्या बातम्यांना प्रतिसाद देणार नाही. एक दिवसापूर्वीच असे दिसून आले होते की, भारताच्या विश्वचषक संघातील बदलांबद्दल काही अहवाल लिहिले गेले होते. हे कोण म्हणाले? विराटने निर्णय घेतला आणि बीसीसीआयला कळवले. आज मीडिया म्हणत आहे की, खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली. अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. आणखी काही समस्या आहे का?’ असा सवालही धुमाळ यांनी माध्यमांना उपस्थित केला आहे. त्याचबरोबर नाराजी आणि संघात फूट पडणे अशा प्रकारचे दावे बीसीसीआयने नाकारले आहेत. कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्यात बीसीसीआयचा कोणताही हात नाही आणि स्वतः कोहलीनेच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

बीसीसीआयने मीडिया रिपोर्ट्सवर उपस्थित केले प्रश्न
बीसीसीआयकडून असे सांगण्यात आले की, कोहलीने टी-२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर २४ तासांच्या आतच असं वाटू लागलं की, माध्यमांकडेच टीम इंडियाच्या सर्व बातम्या आहेत, पण कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा करण्यापूर्वी याबाबत कुणालाही माहिती नव्हती. धुमाळ म्हणाले की, ‘अशा बातम्यांमुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होत आहे. संघाच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पत्रकारांचे मत असू शकते, हे आम्ही समजू शकतो. पण ते एक मत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो, पण यावरून गोष्टी रचणे योग्य नाही.

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये असे म्हटले होते की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर कोहलीने खेळाडूंना फटकारले होते. त्यानंतर, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी कोहलीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचप्रमाणे अश्विनच्या तक्रारीचा दावाही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: