सीएनजी,पाईप गॅस महागणार;अडीच वर्षानंतर केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना जोरदार झटका


हायलाइट्स:

  • सरकारने गुरुवारी नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत तब्बल ६२ टक्के वाढ केली आहे.
  • या दरवाढीने सीएनजी आणि पाईप गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता.
  • मुंबई, दिल्ली या शहरात घरगुती वापरासाठी पाईप गॅसने पुरवठा केला जातो.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने जबर झटका दिला आहे. सरकारने गुरुवारी नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत तब्बल ६२ टक्के वाढ केली आहे. या प्रचंड दरवाढीने नजीकच्या काळात वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वर्षाला ६००० नाही, तर ३६००० रुपये मिळतील, असा करा अर्ज
सार्वजनिक क्षेत्रात ओएनजीसी आणि ऑइल इंडिया या दोन कंपन्यांना नैसर्गिक वायूसाठी २.९० डॉलर प्रती दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट असा दर निश्चित करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांसाठी हा दर निश्चित करण्यात आला असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनलेसिस सेल या विभागाने म्हटलं आहे. एप्रिल २०१९ नंतर पहिल्यांदाच गॅस दरवाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय; ‘पीपीएफ’सह अल्प बचतीच्या योजनांवर मिळेल इतके व्याज
याशिवाय खोल समुद्रात उत्खननातून उत्पादन केल्या जाणाऱ्या नॅचरल गॅससाठी किमान दर थेट ६.१३ अमेरिकन डॉलर प्रती दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट इतका वाढवण्यात आला आहे. सध्या हा दर ३.६३ डॉलर आहे. या दरवाढीने सीएनजी आणि पाईप गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

अखेरच्या सत्रात पडझड ; गुंतवणूकदारांना बसला ५० हजार कोटींचा फटका
मुंबई, दिल्ली या शहरात घरगुती वापरासाठी पाईप गॅसने पुरवठा केला जातो. यापूर्वी महानगर गॅसने पाईप गॅसच्या किमतीत वाढ केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांना पाईप गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

… तर शेतकऱ्यांना बसणार महागाईचा शॉक
नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या भरमसाठ दरवाढीचा परिणाम वीज निर्मिती आणि खत उत्पादक कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.वीज निर्मितीसाठी आणि खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. त्यामुळे विजेच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तर उत्पादन खर्च वाढल्यास खत उत्पादकांडून भाववाढ केली जाण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: