तालिबानला चीनकडून ३.१ कोटी डॉलरची मदत; मदतीचे साहित्य सुपूर्द


काबूल/बीजिंग: चीनने तालिबानला ३.१ कोटी डॉलरच्या मदतीचा पहिला टप्पा तालिबानच्या हंगामी सरकारला पाठवला आहे. आणीबाणीच्या काळासाठी करण्यात आलेल्या मदतीमध्ये हिवाळ्यासाठीचे कपडे, ब्लँकेट अशा गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री चीनकडून देण्यात आलेली मदत पोहोचली. चीनच्या शिन्वा वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले.

चीनचे अफगाणिस्तानमधील राजदूत वँग यू आणि अफगाणिस्तानमधील काळजीवाहू सरकारचे निर्वासितांचे मंत्री खलील-उर-रहमान हक्कानी विमानतळावर उपस्थित होते. अत्यंत कठीण काळात चीनने मदतीसाठीचे साहित्य तातडीने अफगाणिस्तानला पाठवले. हिवाळ्यामधील कपडे, ब्लँकेट आदी साहित्याचा यामध्ये समावेश आहे. अन्नधान्य आणि इतर मदतही लवकरच पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले. हक्कानीकडून चीनचे आभार मानण्यात आले. तालिबानने यावेळी चीनला अफगाणिस्तानचा मित्र म्हणून संबोधले. अफगाणिस्तानमध्ये आर्थिक संकट मोठे असून, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. अफगाणिस्तान शेजारी देशांना दिलेले आश्वासन पाळण्यास कटिबद्ध असल्याचे हक्कानीने सांगितले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना करू देणार नाही, याचा त्याने पुनरुच्चार केला.

चीनकडून पूर्व लडाख सीमेवर जुळवाजुळव सुरूच; लष्करी तळ बळकट करण्यावर भर
दरम्यान, तुर्की आणि उझबेकिस्तानने अफगाणिस्तानला विमानांचे उड्डाण सुरू केले आहे. भारताने अद्याप याचा निर्णय घेतलेला नाही. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच दोन देशांनी अफगाणिस्तानमधून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात केली आहे.

पाकिस्तानचे कौतुक तर काश्मीरबाबत तालिबानने केले ‘हे’ वक्तव्य

अफगाणिस्तान: तालिबानी राजवटीचा आदेश; दाढी कापण्यावर बंदी
महिलांच्या आंदोलनात गोळीबार

काबूल : एकीकडे सर्वसमावेशक सरकारचे आश्वासन देताना तालिबानने महिला निदर्शकांचा विरोध हिंसक पद्धतीने गुरुवारी मोडून काढला. हवेत गोळीबार करून व महिलांना मागे रेटून आंदोलन शमविण्यात आले. सहा महिलांनी एका शाळेसमोर मुलींच्या हक्कासाठी व शाळा बंद न करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: