खरात,माडगुळकर बंधू, इनामदार,पंताच्या स्मारक पुर्तीसाठी पुढे या – सादिक खाटीक यांचे आवाहन

पाच आटपाडीकरांचे स्मारक पूर्तीताठी माणदेशींनी पुढे यावे
   आटपाडी,दि.१/१०/२०२१/प्रतिनिधी - कै. शंकरराव खरात,माडगूळकर बंधू ,इनामदार आणि भवानराव पंतप्रतिनिधी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेल्या आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आटपाडीशी संबध असणाऱ्या पाच आटपाडीकरांचे स्मारक पूर्तीताठी माणदेशींनी पुढे यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केले आहे .

     ग.दि.माडगूळकर यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून गदिमांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन करून सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै.शंकरराव खरात यांचा जन्म आटपाडीचा, महाराष्ट्र वाल्मीकी ग.दि.माडगूळकर यांचे जन्मगांव शेटफळे , ख्यातनाम कथाकार व्यंकटेश तात्या माडगूळकर यांचे जन्म स्थान माडगुळे ,थोर साहित्यिक ना.सं. इनामदार यांचे जन्मगांव गोमेवाडी. या चारही साहित्यिकांची जन्मगावे आटपाडी तालुक्यातीलच आहेत आणि औंधाचे लोकशाही पुरस्कर्ते राजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्यासह या पाच मान्यवर साहित्यिकांची या मातीशी नाळ जोडली गेली आहे . औंध संस्थानचा मुख्य महाल आटपाडी तालुका होता. इथल्या साहित्यीक ,कलेचे भोक्ते,नकलाकर,कलाकार, ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी, खेळाडू,व्यायामपटू इत्यादींना राजाश्रय देण्याचे काम या लोकशाही आणि पुरस्कर्त्या साहित्यिक राजांनी केले होते.देशाला स्वातंत्र मिळण्याआधीच आपल्या संस्थानात लोकशाही स्थापन करून पंतप्रतिनिधींनी मंत्रिमंडळ व आमदारांच्या हातात राज्य कारभार सोपविला होता .

     ग.दि.माडगुळकरांचे शेटफळे येथे पन्नास लाखाचे स्मारक उभारले गेले आहे.त्याला आजही परिपूर्णता लाभली नाही . गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी सुमारे १४ कोटीच्या गदिमांच्या नावाच्या आटपाडीतल्या नाट्यगृहाची घोषणी केली गेली तथापि गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष संपून आणखी एक वर्ष पूर्ण झाले परंतु त्या नाट्यगृहाचा अद्याप पायाही काढला गेलेला नाही . अन्य स्मारकांसाठीही सातत्याने आवाज उठविला गेला आहे . शंकरराव खरात हे दलित आणि राजकीय दृष्ट्या मागास उपेक्षित वंचित असलेल्या आटपाडीचे असल्याने त्यांच्या स्मारकासंबधी शासन व्यवस्थेतले कोणी ही ब्र काढायला तयार नसल्याने माणदेशी माणसांमध्ये आणि विशेषतः आटपाडी तालुका वाशीयांमध्ये संतापाची लाट निर्माण होवू लागली आहे . खरातांचे आटपाडीतले नातलग विलास खरात यांनी शासनाने काही न केल्यास जे जवळ आहे ते विकून जमेल तेवढ , जमेल तसं झोपडीवजा स्मारक उभारण्याचा त्रागा व्यक्त केला आहे . २०२१ हे शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे . खरातांच्या जन्म शताब्दी च्या औचित्याने या पाच ही साहित्यीकांची परिपूर्ण स्मारके तातडीन उभारली गेली पाहीजेत . माडगुळे येथे गदिमा,व्यंकटेश तात्यांचे, आटपाडीत शंकरराव खरात,औंधच्या राजांचे व गोमेवाडीत ना.सं. इनामदारांचे स्मारक उभारले पाहीजे. या प्रत्येकांची वेगवेगळी स्मारके उभारली गेली पाहिजेत.

    आटपाडीचे सुपुत्र ए.बी.पी.माझा मराठी न्यूज चॅनेल मुंबईचे संपादक राजीव खांडेकर, माजी केंद्रिय मंत्री राम नाईक,आटपाडी हे पूर्वजांचे गाव असणारे आमदार अरुण लाड, आटपाडीवर विशेष आस्था असणारे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री महादेव जानकर,माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे,गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर या माणदेशीनी आणि आटपाडी तालुक्यातील विविध राजकीय पक्ष्यांचे नेते मंडळीनी यासाठी पुढे यावे,सर्वप्रथमतः जन्मशताब्दी वर्षातच शंकरराव खरात यांचे भव्य स्मारक उभे करून उर्वरीत साहित्यीकांच्या स्मारक पूर्तीसाठी जोरदार प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त करून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , खानापूर आटपाडी मतदार संघाचे नेते अमरसिंह देशमुख यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील नेते आणि माणदेशी मान्यवरांचा समन्वय करीत या स्मारकांच्या पूर्तीसाठी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: