कार चालकानं अचानक युटर्न घेतल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक व्हिडिओ


हायलाइट्स:

  • लोअर परळ उड्डाणपुलावर भीषण अपघात
  • कार चालकाने युटर्न घेतल्याने अपघात
  • दोघा बाईकस्वाराचा मृत्यू

मुंबईः लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील फिनिक्स मॉल समोरीच उड्डाणपुलावर विचित्र अपघात घडला आहे. कारने अचानक युटर्न घेतल्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीचा कारचा धक्का लागला. यामुळं दुचाकीसमोर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ( Lower Parel Bridge Accident)

बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. कार चालकाने कार सुरू असतानाच अचानक युटर्न घेतला. यावेळी समोरुन दुचाकी येत होती. मात्र, कारने अचानक युटर्न घेतल्यानं कारचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळं तरुण थेट दुचाकीसह सपरटत पुढे गेला. त्याच वेळी त्यासमोरुन येणारा दुचाकीस्वारही गोंधळला. या अपघातानंतर कारचालक थांबला नाही. त्याने कार युटर्न घेतली आणि तिथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

वाचाः औषधांचा खर्च परवडत नाही; निर्दयी बापाने पोटच्या मुलाला नदीत फेकले

या अपघातानंतर दोन तरुणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारची नंबरप्लेट अस्पष्ट दिसत असल्यानं या कार चालकाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरलं आहे.

वाचाः रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं नागरिक हैराण; महापालिकेविरूद्ध तरुणाची कोर्टात धावSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: