अमेरिकेचा अल-कायदाला धक्का; वरिष्ठ कमांडरचा ड्रोन हल्ल्यात खात्मा


वॉशिंग्टन: अमेरिकेने अल कायदाला धक्का दिला आहे. अल कायदाचा वरिष्ठ कमांडर सलीम अबू-अहमद याचा एका ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात आला. सीरियामध्ये ही कारवाई करण्यात आली. संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने या कारवाईची माहिती दिली.

अबू अहमदवर सीरियातील इदलिब प्रांतात २० सप्टेंबर रोजी ड्रोन हल्ला करण्यात आला. मात्र, दहशतवादी ठार झाल्याची पुष्टी गुरुवारी झाली. अमेरिकेने या हल्ल्यात कोणत्या प्रकारचे शस्त्र वापरले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. CENTCOM चे प्रवक्ते मेजर जॉन रिगस्बे यांनी गुरुवारी मिलिट्री टाइम्सला सांगितले की, सलीम अबू-अहमद सीमेपलिकडून होणारे दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणे आणि कारवायांसाठी निधी जमवत असे.

अमेरिकेकडून ‘या’ क्षेपणास्त्राची चाचणी; रशिया-चीनला भरणार धडकी!
या हल्ल्यात सामान्य नागरिकांची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दहशतवाद्यांचे जाळे कमकुवत करण्यासाठी आणि दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. अबू-अहमदबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. वृत्तानुसार, अमेरिका आणि ब्रिटनच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश नव्हता.

पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटनांना आश्रय; पाच संघटनांकडून भारतविरोधी कारवाया
दरम्यान, मागील महिन्यात काबूलमध्ये करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात सामान्य नागरिक ठार झाले होते. ही बाब समोर आल्यानंतर अमेरिकेवर टीका सुरू झाली होती. तालिबाननेही अमेरिकेला ड्रोनद्वारे होणारी कारवाई बंद करण्यास सांगितली होती. अमेरिकेनेही या ड्रोन हल्ल्यात सामान्य नागरिकांची जीवितहानी झाल्याची कबुली दिली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: