Corona Vaccination: भारतीयांना करोना लसीचा ‘बुस्टर’ डोस दिला जाणार? तज्ज्ञ म्हणतात…


हायलाइट्स:

  • प्रशासनाचं लक्ष सर्व सज्ञान नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यावर
  • ‘बुस्टर डोसचा मुद्दा प्रासंगिक नाही’
  • ‘देशातील सर्व नागरिकांपर्यंत करोना लस पोहचणं आवश्यक’

नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत करोना लसीच्या ८९.०२ कोटी डोसचा वापर करण्यात आला आहे. बहुतांश नागरिकांनी करोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. अशावेळी नागरिकांना करोना लसीचा बुस्टर डोस मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रश्नाला ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’चे (ICMR) संचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी उत्तर दिलंय.

सध्या तरी प्रशासनाचं लक्ष देशातील सर्व वयस्क नागरिकांना करोना लसीचे दोन डोस देऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करण्यावर आहे. अशावेळी बुस्टर डोसचा मुद्दा प्रासंगिक नाही, असं मत यावेळी डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं.

बुस्टर डोस देण्याविषयी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या देशातील सर्व नागरिकांपर्यंत करोना लस पोहचणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

देशातील लसीकरणाची स्थिती स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आकडेवारी सादर केली. यानुसार, देशात ६९ टक्के सज्ञान नागरिकांना कमीत कमी एक डोस देण्यात आला आहे. तर २५ टक्के नागरिकांना करोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

VIDEO : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली सात मजली इमारत, जीवितहानी टळली
Monsoon Update : १९६० नंतर दुसऱ्यांदा ‘मान्सून’ उशिरा सुरू करतोय परतीचा प्रवास
ग्रामीण भागाचा लसीकरणाचा दर अधिक

शहरी भागांतील कोविड १९ लसीकरण केंद्रांवर जवळपास ३५ टक्के नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. तर ग्रामीण क्षेत्रात लसीकरण केंद्रांवर ६४ टक्के नागरिकांचं लसीकरण झालं. याचाच अर्थ ग्रामीण क्षेत्रातील लसीकरणाचा दर शहरी क्षेत्राहून अधिक आहे.

चंदीगड, लक्षद्वीप, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार आणि सिक्कीम या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत १०० टक्के सज्ञान नागरिकांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे.

सतर्कता आवश्यक

करोना संक्रमण बऱ्यापैकी आवाक्यात आलं असलं तरी नागरिकांनी सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं, असा सतर्कतेचा इशाराही आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलाय. तसंच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर करोना नियमांचं पालन करत उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

Farmers Protest: पावसात धान्य शेतातच पडून, भाजप नेत्यांना शेतकऱ्यांचं खुलं आव्हान
Farmers Protest: शेतकरी आंदोलक -पोलिसांची पुन्हा धुमश्चक्री; आंदोलकांवर पाण्याचा माराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: