india china news : चिन्यांना चिरडणार! लडाखमध्ये पहिल्यांदाच k9-vajra ची अख्खी रेजिमेंट तैनात


नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तान दोन्ही सीमेवर कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज एम. नरवणे म्हणाले. पूर्व लडाख आणि उत्तर आघाडीपर्यंत मोठ्या प्रमाणावर चीनने सैनिक तैनात केले आहेत, असं जनरल नरवणे यांनी सांगितलं. नरवणे यांनी शुक्रवारी पूर्व लडाखमधील आघाडीवरील चौक्यांवरील सुरक्षेचा आढावा घेतला. पाक सीमेवर अलिकडील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबतही ते बोलले. पाकिस्तानने कुठल्याही दहशतवादी करावायांना पाठिंबा देऊ नये, असं हॉटलाइन आणि डीजीएमओ स्तरावरील चर्चेत पाकला सांगण्यात आलं आहे.

चीनसोबत होणार चर्चा

आम्ही चीनच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही पायाभूत सुविधा आणि सैनिकांनुसार समान तैनाती करत आहोत. यावेळी भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. गेल्या ६ महिन्यांत परिस्थिती सामान्य आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात चीनसोबत चर्चेची १३ वी फेरी होऊ शकते. पण सध्या चीनने सीमेवर आघाडीच्या ठिकाणांवर वाढवलेली सैनिकांची तैनाती ही चिंतेची बाब असल्याचं नरवणे यांनी सांगितलं.

शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी K9- वज्र लद्दाखमध्ये तैनात

चीन सीमेवर कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये आपले सर्वाधिक शक्तीशाली आणि घातक अस्त्र K9- वज्र तैनात केले आहे. K9- वज्र हा रणगाडा तसंच तोफही आहे. K9- वज्रच्या तोफेतून ५० किलोमीटपर्यंत शत्रूवर हल्ला करून त्याला उद्ध्वस्त करता येऊ शकते.
गेल्या काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याच्या सीमेवरील हालचाली पाहता K9- वज्र तैनात करण्यात आले आहेत. K9- वज्र या रणगाड्यावर स्वयंचलीत हॉवित्झर तोफ आहे. या K9- वज्रची एक अख्खी रेजिंमेट भारतीय लष्कराने चीन सीमेवर आघाडीच्या ठिकाणांवर तैनात केली आहे. एका रेजिमेंटमध्ये जवळपास ४५ ते ५० रणगाडे असतात.

K9- वज्रची वैशिष्ट्ये

K9- वज्र हा रणगाडा आहे. रणगाड्याचं आणि तोफचं ही दोन्ही कामं K9- वज्र करतो. रणगाड्यावरील १५५ मिमीची हॉवित्झर तोफ ५० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. रणगाड्याप्रमाणे तो शत्रूच्या गोळीबारापासून जवानांची सुरक्षाही करतो. K9- वज्र हे कुठल्याही प्रकारच्या जमिनीवरून धावू शकते. याचा वेग हा ६७ किमी प्रतिसात इतका आहे. यात एकूण ५ जवान बसू शकतात.

२०१८ मध्ये भारतीय लष्करात K9- वज्रचा समावेश करण्यात आला होता. पण लडाखमध्ये पहिल्यांदाच त्याची तैनाती करण्यात आली आहे.

लडाखमध्ये जगातील सर्वात मोठा ध्वज

भारतीय लष्कराने लडाखमध्ये जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवला आहे. लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथूर यांनी महत्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त खादीपासून बनवण्यात आलेल्या तिरंग्याचे अनावरण केले आहे. हा राष्ट्रध्वज १४०० किलोग्रॅमचा आहे. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत हेकॉप्टर्सनी फ्लाय पास्ट केले. या राष्ट्रध्वजाची लांबी २२५ फूट, रुंदी १५० फूट आणि वजन १४०० किलोग्रॅम आहे. हा राष्ट्रध्वज बनवण्यासाठी ४९ दिवस लागले आणि ४५०० मीटर खादीचा उपयोग करण्यात आला. यावेळी लष्कर प्रमुख जनरल नरवणेही उपस्थित होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: