अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी

अवैध वाळु उपशाविरुध्द गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेत पडलेल्या खड्यांत उभारली गुढी


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


पंढरपुर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०४/२०२४ : आज गुढी पाडव्याच्या दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व सहकार्‍यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यात गुढी उभारुन अनोखं आंदोलन केलं. यावेळी अवैध वाळु उपशाकडं दुर्लक्ष करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांविरुध्द तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली.

गेल्या अनेक वर्षांपासुन महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने गणेश अंकुशराव व त्यांचे कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. यासाठी त्यांनी विविध लक्षवेधी आंदोलनं सुध्दा केली आहेत.

पंढरपुरचे तत्कालीन तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी अवैध वाळु उपशाकडं अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गणेश अंकुशराव यांनी त्यांच्या बदलीची मागणी लावुन धरली होती.

यावेळी बोलताना गणेश अंकुशराव म्हणाले की, आम्ही अवैध वाळु उपशाविरुध्द विविध आंदोलनं करुनही वाळु उपसा थांबत नाही. अवैध वाळु उपशामुळे चंद्रभागेच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झालाय, चंद्रभागेच्या पात्राचा आकार बदललाय, मोठमोठ्या खड्ड्यात बुडून अनेक निष्पाप भाविकांचा बळी गेलाय. चंद्रभागेची अवस्था बकाल बनलीय. त्यामुळे या प्रश्‍नाकडं शासनाने गांभीर्यानं पहाणं गरजेचं आहे. आता तरी नवीन आलेल्या प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी याची दखल घेण्याचे आदेश देऊन अवैध वाळु उपसा करणारां विरुध्द कडक आणि सातत्याने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील काळात लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलनं करु.यापुढे चंद्रभागेच्या पात्रात खड्ड्यात बुडून जर भाविकांच्या जीवीताला धोका झाला अथवा अनुचित घटना घडली तर यासाठी प्रशासकीय अधिकारीच जबाबदार राहतील असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

यावेळी निलेश माने,अरविंद नाईकवाडी, महावीर अभंगराव, सुरज कांबळे, माऊली कोळी, प्रकाश मगर,समाधान कोळी, दत्तात्रय कांबळे,पांगळ्या सुरवसे,भैया अभंगराव,अप्पा करकमकर,अविनाश नाईकनवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading