विमान नगर परिसरातून खंडणीसाठी अपहरण करून तरूणीचा खून
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ एप्रिल २०२४ – विमान नगर परिसरातून खंडणीसाठी अपहरण करून तरूणीचा खून केल्याची घटना घडली त्यासंदर्भातले वृत्त पुण्याच्या दि. ९ एप्रिल २०२४ च्या वृत्तपत्रात छापून आले आहे. या घटनेची विधानपरिषद उपसभापती तथा अध्यक्षा स्त्री आधार केंद्र डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भात विमाननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांच्याशी चर्चा करून त्यांना घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्ला व पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन सूचना केल्या आहेत.यामध्ये घटनेचा सखोल तपास करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावी, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून दक्षता समित्यांची पुनर्रचना करणं आणि दक्षता समित्यांमार्फत तरुण मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात बडी कॉपसारख्या योजना राबवणं आवश्यक आहे.शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग आणि गृहविभाग या सगळ्यांच्या एकत्रित माध्यमातून महिला सुरक्षेबाबत जागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम घेण्यात यावेत अशा सूचना केल्या तसेच मयत मुलीच्या पालकांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------