कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी BRP Covid 19 मदत कक्षाशी संपर्क साधा – अजित संचेती भारतीय राष्ट्रवादी पार्टी

भारतीय राष्ट्रवादी पार्टीने सुरू केलेले BRP Covid 19 मदत कक्ष पुणेकर व पिंपरी चिंचवडकर यांना ठरतंय वरदान -अजित संचेती भारतीय राष्ट्रवादी पार्टी Contact BRP Covid 19 Helpline for treatment of covid patients – Ajit Sancheti Bhartiya Rashtrawadi Party of India

पिंपरी चिंचवड – कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रामध्ये व पुणे , पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड स्वरूपात आली आहे. यामुळे अशी परिस्थिती झाली आहे की रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी नॉर्मल बेड, ऑक्सिजन बेड,आयसीयु व व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते . हे सुरू असतानाच रेमडीसिवर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता.त्यामुळे भारतीय राष्ट्रवादी पार्टीने BRP Covid 19 मदत कक्ष पुणे व पिंपरी चिंचवडकर यांच्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले.या कक्षासाठी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश संपर्क प्रमुख अजित संचेती यांच्याकडे कक्ष प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली.

 पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर हे पहिले कक्ष सुरू झाले.सुरवातीला ६ पदाधिकार्यांच्यात सुरू करण्यात आले . पाहिले 5 दिवस बेड मदतीसाठी फॉर्म व तक्रार फॉर्म घेऊन 2 एप्रिलला सुरवात करण्यात आली.या टीममध्ये आज 23 पदाधिकारी, समाजसेवक व डॉक्टर काम करत आहेत आणि आज आमची पूर्ण टीम महाराष्ट्रभर काम करत आहे. एकूण 45 जण काम करत आहेत,या मध्ये आजपर्यंत 200 च्यावर ऑक्सिजन बेड,53 च्यावर व्हेंटिलेटर बेड,नॉर्मल 20 बेड व 15 जणांना प्लाझमा मिळून देण्यात आला आहे .

    भारतीय राष्ट्रवादी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून हे इंजेक्शन वाटप जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात सुरू झाले आणि आज सर्व हॉस्पिटलला इंजेक्शन मिळत आहेत व रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकना होणार त्रास कमी झाला असून ही टीम 24/7 काम करत आहे .

   महाराष्ट्र मदत कक्ष प्रमुख अजित संचेती यांच्या नेतृत्वाखाली अँड मनुजा साळवे,मनोहर किंगे,अक्षय घोडके,गिरीश पाटील,कुशल शुक्ला, आशुतोष देवकर,शबनम तांबोळी,शुभम राठोड, स्वप्नील खंदारे,प्रथमेश अहिरे व पदाधिकारी आणि डॉ आम्ला आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनावर सुरू आहे. आमचा मदत कक्ष नं 7030402160,7397972328,7038570875,8600453455 हा असूून यावर संपर्क साधावा असे आवाहन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेश  संपर्क प्रमुख अजित संचेती यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: