RCB vs PBKS: मॅक्सवेलच्या अर्धशतकाने बेंगळुरूचे पंजाबला आव्हानात्मक टार्गेट



शारजाह: आयपीएलच्या १४व्या हंगामात विरुद्धच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत २० षटाकत ७ बाद १६४ धावा केल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार अर्धशतक केले.

वाचा-

प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या या लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराटने संघात बदल केला नाही. तर पंजाब किंग्जने मात्र ३ बदल केले होते. आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट आणि देवदत्त पडिक्कल यांनी ६८ धावांची भागिदारी केली. विराट २५ धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ डॅनियल ख्रिस्टिन शून्यावर माघारी परतला. त्यामुळे आरसीबीची अवस्था २ बाद ६८ अशी झाली. तर सलामीवीर देवदत्त ४० धावांवर बाद झाला.

वाचा-

आरसीबीने ११.४ षटकात ३ बाद ७३ इतक्या धावा केल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याला एबी डिव्हिलियर्सने १८ चेंडूत २३ धावा करत चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकात आरसीबीने धावा करण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्या. त्यांनी २० षटकात ७ बाद १६४ धावा केल्या.

वाचा-

पंजाब किंग्जकडून मोईसेस हेन्निक्सने चार षटकात फक्त १२ धावा देत ३ तर मोहम्मद शमीने ३९ धावा देत ३ विकेट घेतल्या. पंजाबला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर या सामन्यात विजय गरजेचा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: