शेअर बाजारात पडझड; रिलायन्स वगळता ‘या’ कंपन्यांच्या बाजार भांडवलात झाली प्रचंड घट
हायलाइट्स:
- अव्वल १० कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये घट झाली.
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस (Infosys) यांना फटका बसला.
- रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल वाढले आहे.
सोन्याचा भाव आणखी खाली येईल; सोने दराबाबत जाणकारांनी व्यक्त केला हा अंदाज
टीसीएसचे बाजार भांडवल ५२,५२६.५३ कोटी रुपयांनी घटून १३,७९,४८७.२३ कोटी रुपयांवर गेले. इन्फोसिसचे बाजार मूल्यांकन ४१,७८२.४ कोटी रुपयांनी घटून ७,०६,२४९.७७ कोटी रुपयांवर आले आहे.
एचडीएफसीची स्थिती २२,६४३.११ कोटी रुपयांनी घसरून ४,९०,४३०.७४ कोटी रुपये आणि आयसीआयसीआय बँकेची २१,०९५.७७ कोटींचे नुकसान होऊन ४,७९,९८५.१३ कोटी रुपयांवर आले. या दरम्यान, बजाज फायनान्सचे बाजार भांडवल १६,४३८.९ कोटींचे नुकसान होऊन ४,५४,०२६.६८ कोटी रुपयांवर घसरले. एचडीएफसी बँकेचे मूल्यांकन १०,४१०.४१ कोटी रुपयांनी घसरून ८,७६,३२९.४५ कोटी रुपये झाले आहे.
‘एलआयसी’चा IPO ; पुढील महिन्यात केंद्र सरकार हे पाऊल उचलणार
या आठवड्यादरम्यान, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL)चे बाजार भांडवल ९,२२२.१४ कोटी रुपयांनी घटून ६,३४,९७७.०४ कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेचे ६,४१५.०८ कोटी रुपये कमी होऊन ३,९५,५६३.६७ कोटी रुपये झाले.
हेल्थ इन्शुरन्स घेताय; ‘या’ पाच गोष्टी ठेवा लक्षात आणि मग करा योजनेची निवड
यांना झाला फायदा
या दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २५,२९४.३८ कोटी रुपयांनी वाढून १५,९९,३४६.४१ कोटी रुपये झाले आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची बाजारातील स्थिती ९,७७३.३३ कोटी रुपयांनी वाढून ४,०३,१६९.३३ कोटी रुपये झाली आहे.
अव्वल १० कंपन्यांची यादी
रिलायन्स इंडस्ट्रीजने अव्वल १० कंपन्यांच्या यादीत पहिले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक आहेत.