ashok gehlot : मुख्यमंत्री गहलोत यांचा भाजप, RSS वर निशाणा; म्हणाले, ‘महात्मा गांधीजींचे नाव…’


जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ( ashok gehlot ) यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी आरएसएस आणि भाजपने महात्मा गांधींना स्वीकारले, असा आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला आहे. ‘६० वर्षांनंतर हे लोक महात्मा गांधींना स्वीकारल्याचा दावा करत आहेत. तर ज्या व्यक्तीने गांधीजींची हत्या केली, तो यांच्या विचारसरणीने प्रभावित होता. संपूर्ण जगाला हे माहित आहे. यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधींना स्वीकारले आहे’, असं गहलोत म्हणाले.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना आपले आवाहन आहे. त्यांनी गांधीजींना स्वीकारलेच आहे, तर त्यांच्या अहिंसा, सत्य आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्व आपल्या जीवनात अंगीकारावी. तुम्ही असं केल्यास हिंदुत्व आणि लव जिहाद सारखे मुद्दे आपोआप संपतील, असं गहलोत म्हणाले.

piyush goyal : ‘काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतेय’

mamata banerjee : अखेर ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली; भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली

महत्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विजयासाठी सत्याग्रह पुरेसा आहे. महत्मा गांधीजींच्या सत्याग्रहाशी सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा संबंध जोडला. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला.

navjot singh sidhu : ‘संपूर्ण काँग्रेस नवज्योत सिंग सिद्धूंच्या कॉमेडीत रंगलीय’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: