पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाला; शस्त्रक्रियेने काढले एक किलो खिळे, नट बोल्ट!


विल्नियस: पोटदुखीमुळे हैराण झालेल्या एका व्यक्तीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्यांना धक्काच बसला. डॉक्टरांनी तपासणीसाठी काढलेल्या क्ष-किरणात रुग्णाच्या पोटात धातूचे तुकडे आढळले. यामधील काही तुकडे १० सेमी इतक्या लांबीचे होते. अखेर शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून खिळे, नट बोल्ट काढण्यात आले.

युरोपातील लिथुनिआ देशातील क्लापेडा शहरात ही घटना घडली. ‘गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी पोटदुखीमुळे हैराण असलेल्या रुग्णाच्या पोटातून जवळपास एक किलो खिळे, नट बोल्ट, नखे काढली. मागील महिन्यात या धातूच्या वस्तू या रुग्णाने गिळल्या होत्या. जवळपास तीन तास शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून या वस्तू काढण्यात आल्या.

लग्नात जेवायला दिले नाही; फोटोग्राफरने नवरदेवासमोर डिलीट केले सगळे फोटो

हे कसं शक्य आहे? इंग्लंडमध्ये सांगलीच्या बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची!

Klaipėda University Hospital चे प्रमुख सर्जन Algirdas Slepavicius यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, आतापर्यंतच्या वैद्यकीय कारकिर्दीत अशी घटना कधीही पाहिली नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने माध्यमांना एका सर्जिकल ट्रेचा एक फोटो दिला. या फोटोत सर्जिकल ट्रे हा नखे, खिळे, स्क्रू आदी वस्तूंनी भरला होता. याआधी देखील सप्टेंबर महिन्यात एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या रुग्णाने नोकिया ३३१० मोबाइल गिळला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: