केन्स्टार कंपनीकडून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस अकरा कुलर भेट
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10 – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस केन्स्टार कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाचे अकरा नग कुलर भेट मिळल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
या सर्व कुलरची अंदाजित किंमत एक लाख इतकी असून मंदीर समितीकडून कंपनीच्या प्रतिनिधींचा मंदिर समितीचे विभाग प्रमुख राजेश तेलतुंबडे व सहायक विभाग प्रमुख सावता हजारे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
मागील महिन्यात संबंधित कंपनीचे प्रतिनिधी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर येथे आले होते.त्यावेळी त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी सेवाभावी तत्वावर मोफत कुलर उपलब्ध करून देण्याची इच्छा दर्शविली होती.
त्यानुसार त्यांनी आज अकरा नग कुलर उपलब्ध करून दिले आहेत.दिवसेंदिवस उष्णतेची दाहकता वाढत असून दर्शन रांगेतील भाविकांना या कुलर पासून थंडावा मिळण्यास मदत होणार आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------