बिटकॉइन ४८ हजार डॉलरवर ; जाणून घ्या आज कोणत्या क्रिप्टोकरन्सीमध्ये झाली वाढ


हायलाइट्स:

  • जगभरात पुन्हा एकदा डिजिटल करन्सीची मागणी वाढली आहे.
  • जगातील लोकप्रिय डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनचा भाव ४८ हजार डॉलरवर गेला.
  • बिटकॉइनच्या दरात आज ०.६७ टक्के वाढ झाली.

मुंबई : जगभरात पुन्हा एकदा डिजिटल करन्सीची मागणी वाढली आहे. आज रविवारी जगातील लोकप्रिय डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनचा भाव ४८ हजार डॉलरवर गेला. बिटकॉइनच्या दरात आज ०.६७ टक्के वाढ झाली. त्याचबरोबर इथेरियमचा भाव २.१९ टक्क्यांनी वधारला.

शेअर बाजारात पडझड; रिलायन्स वगळता ‘या’ कंपन्यांच्या बाजार भांडवलात झाली प्रचंड घट
आज बिटकॉइनचा भाव ४८१०२.४६ डॉलर झाला. त्यात ०.६७ टक्के वाढ झाली. मागील आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत ११.३४ टक्के वाढ झाली आहे. तर बिटकॉइनचे बाजार भांडवल ८९९.९४ अब्ज डॉलर इतके वाढले आहे.

सोन्याचा भाव आणखी खाली येईल; सोने दराबाबत जाणकारांनी व्यक्त केला हा अंदाज
गेल्या आठवड्यात चीनमधील घडामोडींचे पडसाद क्रिप्टो करन्सी मार्केटवर उमटले होते. चीनने सरसकट डिजिटल करन्सीच्या व्यवहारांना बेकायदा ठरवले आहे. तसेच या व्यवहारांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली. त्यातच एव्हरग्रँडे या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीच्या दिवाळखोरीच्या भूमिकेने क्रिप्टो करन्सी बाजाराला मोठा फटका बसला होता.

हेल्थ इन्शुरन्स घेताय; ‘या’ पाच गोष्टी ठेवा लक्षात आणि मग करा योजनेची निवड
बिटकॉइनपाठोपाठ दुसरे लोकप्रिय आभासी चलन असलेल्या इथेरियमच्या किमतीत देखील आज वाढ झाली. इथेरियमचा भाव २.१९ टक्क्यांनी वाढला आणि तो ३३६०.६६ डॉलर झाला आहे. आज एका XRP चा भाव ०.९८ डॉलर इतका असून त्यात ८.१८ टक्के घसरण झाली. कार्डानोचा भाव २.२३ डॉलर इतका असून त्यात ०.२५ टक्के वाढ झाली आहे. पोलकॅडोटच्या एका कॉइनचा भाव ३१.४८ डॉलर इतका आहे. त्यात २.७३ टक्के घसरण झाली आहे.

स्वस्तात घर खरेदीचा संधी ; बँंक ऑफ बडोदाची आॅफर, जाणून घ्या कधी होणार लिलाव
सोलानाच्या किमतीत आज ४.५५ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव १६७.९३ डॉलर झाला आहे. आज Binance Coin च्या किमतीत १.६६ टक्के वाढ झाली असून त्याचा भाव ४२४.७९ डॉलर इतका वाढला आहे. डोजेकॉइनचा भाव ०.२१ डॉलर असून त्यात २.५५ टक्के घसरण झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: