समोसा अँड सन्स चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

शालिनी शाह यांच्या ‘समोसा अँड सन्स चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि.०४/१०/२०२१ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह यांच्या ‘समोसा अँड सन्स’ या चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले.

सदर चित्रपट समाजातील दांभिकतेवर आधारित हलके फुलके प्रहसन असल्याचे शालिनी शाह यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व गायक यांचे अभिनंदन केले. संजय मिश्रा यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. यावेळी चंदन बिष्ट, नेहा गर्ग, जितु शास्त्री व बिजेंद्र काला प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: