T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी झुंबड उडाली; एका तिकिटासाठी तब्बल…


दुबई: येत्या १७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० वर्ल्डकपची सुरूवात होणार आहे. करोनामुळे ही स्पर्धा भारता ऐवजी युएई आणि ओमान येथे आयोजित होणार आहे. सध्या आयपीएलचा १४वा हंगाम सुरू असला तरी सर्व संघ आणि चाहत्यांची नजर टी-२० वर्ल्डकपवर आहे. वर्ल्डकप सामन्यांनासाठी स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

वाचा- गेल्या वेळेची धुलाई आठवते का? मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने राजस्थानला दिले ओपन चॅलेंज

वर्ल्डकपसाठी करण्यात आलेल्या ग्रुप बी मध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही संघात २४ ऑक्टोबर रोजी लढत होणार आहे. आयसीसीने वर्ल्डकपच्या सामन्यांची तिकिट विक्री ३ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. सर्वात स्वस्त तिकीटाची किमत ६०० रुपये इतकी आहे. पण भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याच्या तिकिटासाठी लाखो रुपये क्रिकेट चाहते मोजत आहेत. आयसीसीच्या दरापेक्षा तिकीट दर ३३३ टक्के अधिक महाग विकले जात आहे.

वाचा- Video: ९ कोटी २५ लाखाच्या खेळाडूला साधा कॅच घेता आला नाही, विजय मिळवणाऱ्या सामन्यात झाला

आयसीसीने वेगवेगळ्या स्टँडसाठी वेगवेगळी किमत आकारली आहे. याची सुरुवात १२ हजार ५०० पासून ५४ हजार १०० इतकी आहे. आयसीसीच्या टी-२० वर्ल्डकपच्या वेबसाईटवरून या तिकिटांची खरेदी करता येवू शकते. भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याप्रमाणेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याच्या तिकिटांचे दर अधिक आहेत.

वाचा- आज मुंबई इंडियन्सच्या चुकीला माफी नाही; कारण…

ज्या क्रिकेट चाहत्यांना सामने पाहायचे आहेत त्याना करोनाच्या लसीचे दोन डोस घेतल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. शारजाह येथील सामन्यात फक्त १६ वर्षावरील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याच बरोबर लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दाखवावा लागले.

वेस्ट इंडिज संघाने आतापर्यंत सर्वाधिक दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. भारताने २००७ साली पहिल्या टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले होते. भारताबरोबरच पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड यांनी प्रत्येकी एक वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघाला अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: