अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर
अनेक नव्या चेहऱ्यांना संधी – प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पंढरपूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके, युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे,विद्यार्थी संघटनेचे नेते संकेत ढवळे, सुरज पेंडाल,सुरज गंगेकर,रफिक मुलाणी, प्रदिप तांडेल, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड, शहराध्यक्ष अमोल परबतराव,शहर कार्याध्यक्ष शुभम पवार यांच्या उपस्थितीत नुतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.
यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी संविधार चव्हाण,शहर खजिनदारपदी माऊली कुंभार,शहर उपाध्यक्षपदी अजित यादव,रोहन तारापूूरकर,शहर चिटणीसपदी सागर वाडेकर,शहर सचिवपदी समाधान पाटोळे यांचा समावेश आहे.सदर निवडी शहराध्यक्ष अमोल परबतराव यांनी केलेल्या आहेत.
प्रास्ताविकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे म्हणाले की, आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून विविध पदांवर काम करण्याची संधी देण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवकांना संघटित करून अजित पवार यांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार सुरज पेंडाल यांनी मानले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------