हृदयद्रावक! मुळा नदीच्या पुरात दोघे सख्ये भाऊ वाहून गेले


हायलाइट्स:

  • राहुरी तालुक्यात आणि परिसरात रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसामुळे नदीला पूर.
  • पुरात गणपती घाट येथे दोन सख्खे भाऊ वाहून गेले.
  • मुळा धरणातून साडे आठ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

अहमदनगर: राहुरी तालुक्यात आणि परिसरात रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसामुळे (Heavy rainfall) नदीला पूर आला आहे. दुपारी राहुरी शहरातील गणपती घाट येथे पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी दोघे जण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. (the two brothers were swept away in the flood of mula river in ahmednagar)

राहुरीतील गणपती घाट येथे दुपारी पाच मुले नदीत पोहण्यासाठी गेली होती त्यातील राहुल बाळू पगारे (वय १५) व सुमित बाळू पगारे (वय १४) हे दोघे सख्ये भाऊ पुराच्या पाण्यात वाहून गेले. तिघे जण सुखरूप काठावर आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. हे पाचही मित्र असून पोहण्यासाठी नदीच्या पात्रात गेले होते. मध्यभागी बेटासारख्या असलेल्या खडावर ती थांबली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे वाहून गेले, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- ड्रग पार्टी प्रकरणात आणखी कोणाच्या अडचणी वाढणार?; आता मुंबई पोलिसही करणार चौकशी

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुळा धरणातून साडे आठ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी मुळा धरणातून प्रथमच एवढे पाणी सोडण्यात येत आहे. नदीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांचे पाणीही त्यात मिसळत असल्याने मुळा नदी दुधडी भरून वाहत आहे. नागरिकांनी नदी काठी जाताना काळजी घ्यावी, पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे चर्चा
क्लिक करा आणि वाचा- ‘…अन्यथा महाराष्ट्र बंद करू’; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपला इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: