lakhimpur kheri : अमित शहांना भेटले पंजाबचे मुख्यमंत्री; लखीमपूरप्रकरणी योगी सरकारने नेमली SIT
उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात रविवारी झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांच्या मृत्यूवर राजकारण सुरू आहे. या प्रकरणात यूपी सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यूपी पोलिसांनी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यावरून काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी योगी सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला बुधवारपर्यंत अटक न केल्यास पंजाब काँग्रेस लखीमपूर खेरीपर्यंत मोर्चा काढेल. यासोबतच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सोडण्याची मागणीही केली.
sanjay raut met rahul gandhi : राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा, संजय राऊत का सांगत नाहीत?
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी
लखीमपूर खिरी हिंसाचारप्रकरणी चौकशीसाठी उत्तर प्रदेशातील योगी सरकारने ६ सदस्यांची एसआयटी (SIT) नेमली आहे. संध्याकाळी उशिरा यूपी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हिंसाचारात मृत्यू झालेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. तसंच ऑटोप्सी रिपोर्टची मागणी केली आहे.