IPL PLAYOFFS : मुंबई इंडियन्सचा नाद करायला नाय, करो या मरो सामन्यात साकारला अफलातून विजय


शारजा : करो या मरो सामन्यात एखादा चॅम्पियन संघ कसा कामगिरी करू शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ आज मुंबई इंडियन्सने दाखवून दिला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि राजस्थान रॉयल्सच्या संघाला फक्त ९० धावांमध्ये रोखले. या आव्हानाचा धडाकेबाज फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सने सहजपणे पाठलाग केला आणि मोक्याच्या क्षणी विजय मिळवला.

मुंबई इंडियन्ससाठी ९१ धावांचे माफक आव्हान समोर होते, पण रोहित शर्माने यावेळी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. रोहितने यावेळी १३ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर २२ धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवही १३ धावांवर बाद झाला. पण आज संघात आलेल्या इशान किशनने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबईने यावेळी नाणेफेक जिंकली आणि रोहित शर्माने राजस्थानच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज नॅथन कल्टर नाइलने यावेळी राजस्थाला पहिला धक्का दिला. राजस्थानचा यश्सवी जैस्वाल हा भन्नाट फॉर्मात होता, पण नॅथनने त्याला १२ धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमरानेही यावेळी भेदक मारा करत राजस्थानचा सलामीवीर इव्हिन लुईसला बाद केले आणि मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. मुंबईसाठी यावेळी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो जेम्स निशाम. या महत्वाच्या सामन्यात निशामला कृणाल पंड्याच्या बदली संधी देण्यात आली होती. निशामने यावेळी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि फॉर्मात असलेल्या शिवम दुबेला बाद करत मुंबई इंडियन्सला दुहेरी यश मिळवून दिले. त्यानंतर राहुल तेवातियालाही बाद केले आणि आपला तिसरा बळी मिळवला. निशामसह मुंबई इंडियन्सच्या नॅथन कल्टर नाइटने यावेळी अफलातून कामगिरी केली. नॅथनने यावेळी आपल्या चार षटकांमध्ये १४ धावा देत चार विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी दोन विकेट्स मिळवल्या. मुंबईने राजस्थानला ९० धावांवर रोखले आणि तिथेच विजयाचा पाया रचल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: