गृहिणींचं बजेट कोलमडणार; घरगुती गॅस सिलिंडर महागला, मुंबईत एका सिलिंडरसाठी मोजा इतके रुपये


हायलाइट्स:

  • विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बुधवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
  • पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये सुमारे १५ रुपयांची वाढ केली आहे.
  • यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

नवी दिल्ली : सण-उत्सवांच्या तोंडावर नागरिकांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाले आहेत. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बुधवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये सुमारे १५ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्ली आणि मुंबईत विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता ८९९.५० रुपयांवर गेली आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या.

‘यूके’मध्ये दिवाळखोर अन् हजारो कोटी दडवले; ‘पॅंडोरा पेपर्स’मुळे अनिल अंबानींचा खरा चेहरा उघड
५ किलोच्या सिलिंडरची किंमत आता ५०२ रुपये झाली आहे. नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. या दरवाढीनंतर १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत कोलकातामध्ये ९२६ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१५.५० रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता पाटण्यात एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला ९९८ रुपये मोजावे लागतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ८२ डॉलरच्या पुढे गेली आहे.

पॅंडोरा पेपर्स प्रकरण ; केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल, अर्थ मंत्रालयाने घेतला ‘हा’ निर्णय,
याआधीचे दर किती होते?
१ सप्टेंबर रोजी १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. यापूर्वी, १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. गेल्या एका वर्षात दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ३०५.५० रुपयांची वाढ झाली आहे, दुसरीकडे आता गॅस सिलिंडरसाठीची सबसिडीही येणे बंद झाले आहे.

सीएनजी-पीएनजीच्या किमतीही वाढल्या
नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सीएनजी, पीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत २.५५ रुपयांपर्यंत वाढ केली. त्याचबरोबर, पीएनजीच्या किंमतीत २.१० रुपये प्रति घनमीटरने वाढ करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: