Lakhimpur Violence: प्रियांका, राहुल गांधींसहीत तीन नेत्यांना लखीमपूर जाण्याची परवानगी


हायलाइट्स:

  • योगी आदित्यनाथ सरकारनं दिली परवानगी
  • प्रियांका, राहुल यांच्यासहीत विरोधी नेते पीडितांना भेट देणार
  • भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी हेदेखील लखीमपूरच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : बऱ्याच गोंधळानंतर उत्तर प्रदेश सरकारनं लखीमपूर खीरी हिंसाचारातील पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेण्यासाठी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, खासदार राहुल गांधी यांच्यासहीत तीन विरोधी नेत्यांना परवानगी दिलीय. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाकडून ही परवानगी देण्यात आलीय.

Rahul Gandhi: ‘पत्रकार ज्या पद्धतीनं विरोधकांना प्रश्न विचारतात ते लोकशाहीत नाही हुकूमशाहीत विचारले जातात’
Lakhimpur Violence: आम्हाला मारा नाहीतर गाडा, लखीमपूरला जाणारच : राहुल गांधी
गेल्या रविवारी लखीमपूर खीरी भागात उसळलेल्या हिंसाचारात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे. यानंतर सोमवारी, लखीमपूर खीरीला निघालेल्या प्रियांका गांधी यांना सीतापूर जिल्ह्यातील हरगावमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरत ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना सीतापूर पोलीस लाईनमध्ये ताब्यात ठेवण्यात आलं होतं.

तर, मंगळवारी काँग्रेसनं लखीमपूर खीरीला जाण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, योगी आदित्यनाथ सरकारनं सुरुवातीला ही परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आज (बुधवारी) सकाळी राहुल गांधी यांनी आपला लखीमपूर खीरीला भेट देण्याचा निश्चय व्यक्त केला. ‘कलम १४४ पाच जणांना जाण्यापासून रोखू शकतं. मात्र, काँग्रेसचे केवळ तीन जण लखीमपूरला जाणार’ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे लखनऊकडे रवाना होण्यासाठी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. दिल्ली विमानतळावरही त्यांना थोड्यावेळासाठी रोखण्यात आलं. मात्र, नंतर त्यांना लखनऊला जाण्यासाठी विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली.

Priyanka Gandhi: ‘अटकच बेकायदेशीर, बेल बॉन्ड का भरावा?’, प्रियांका गांधींचा प्रश्नPriyanka Gandhi: प्रियांकांच्या अटकेनं कुटुंब धास्तावलंय, पती रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली चिंताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: