बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर


स्टॉकहोम: रसायनशास्त्रातील संशोधनासाठी यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. बेंजामिन लिस्ट (Benjamin List)
आणि डेव्हिड मॅकमिलन (David W.C. MacMillan) यांना वर्ष २०२१ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize in Chemistry for 2021) जाहीर झाला आहे. अॅसिमॅटिक ऑर्गेनोकॅटलिसिसच्या संशोधनासाठी त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांनी मॉलिक्यूलर कंस्ट्रक्शनकरीता एक नवीन उपकरण विकसित केले होते. या उपकरणाचा मोठा फायदा फार्मास्युटिकल संशोधनात झाला आहे.

हवामानाचे कोडे उलगडण्यासाठी भौतिकशास्त्राचे नोबेल; जाणून घ्या संशोधनाविषयी
संशोधकांच्या मते उत्प्रेरक (कॅटलिसिस) आहेत. पहिला प्रकार हा धातू आणि दुसरा प्रकार हा एन्झाइम होता. अकादमीने सांगितले की, सन २००० मध्ये बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांनी तिसऱ्या प्रकारचा अॅसिमॅटिक ऑर्गेनोकॅटलिसिस विकसित केला. हा तिसरा प्रकार लहान कार्बनिक अणूंच्या आधारे तयार झाला आहे.

पुरस्कार विजेत्या संशोधकांना सुवर्णपदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (जवळपास ८.२० कोटी) इतकी रक्कम नोबेल पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

औषधशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापाउटियन यांचा सन्मान
नोबेल पुरस्काराचा इतिहास

नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ ‘नोबेल पुरस्कार’ दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: