तर पोलीस तृतीयपंथीयांवर करणार कारवाई

दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलला जाणार

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज – तृतीयपंथींना आता सिग्नलवर, व्यावसायिक किंवा सार्वजनिक ठिकाणी पैसे मागता येणार नाहीत.कारण दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर (Transgender) पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून सतत तक्रारी येत होत्या मात्र पुणे पोलिसांनी यापूर्वी या तक्रारींकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र आता तक्रारींंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

सिग्नलवर ,स्पिडब्रेकर्सवर उभे राहून जर वाहन चालकांना अडवून पैशाची मागणी केली तर या तृतीयपंथीवर होणार कारवाई होणार आहे, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.

रस्त्यावर उभे राहून पैशाची मागणी केली जात होती नंतर तर घरगुती समारंभमध्ये देखील आमंत्रणशिवाय हजेरी लावली जात होती.ही मागणीही मोठ्या आकड्यात असल्याने ती पुरी करणे अनेक वेळा कठीण होऊन बसले होते.जयपूरला दोन तृतीय पंथीयाकडून‌ एका लग्नामध्ये दिड लाख रुपयांची मागणी करण्यात आली.वर्हाडी मंडळी १० हजार रुपये देण्यासाठी तयार असतानासुद्धा १ लाख पंचवीस हजारावर अडून बसले होते.लग्नाच्या मुहूर्ताची वेळ निघून चालली होती.तृतीयपंथी सोडण्यास तयार नव्हते.शेवटी कसेबसे दुसऱ्या बाजूने नवरा नवरी घेऊन गेले.

अमितेश कुमार यांनी सांगितलं की,शहरात अनेक सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात.अनेकदा पैसे मागण्यासाठी तृतीयपंथी वाहन चालकांकडे जबरदस्ती करताना दिसतात. यातून वादाचे प्रकार होऊन इतर वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.परिणामी सामान्य जनतेला त्रास होत असतो.पुणेकर नागरिक या तृतीयपंथीयांमुळे त्रस्त झाले होते त्यामुळे हा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.पुण्यामध्ये यापुढे तृतीयपंथीयांना सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत. त्याबाबत पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले असून त्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार आहे.

या तृतीयपंथीयांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी यासंदर्भात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या तरीही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई कऱण्यात आली नव्हती.

मात्र आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या तक्रारींची दखल घेत थेट कारवाईचे आदेश दिले असून शहराला शिस्त लावण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

तृतीयपंथी अनेक धार्मिक कार्यक्रमांना देखील जबरदस्तीने हजेरी लावतात आणि तिथे अवाजवी पैशाची मागणी करतात अशा तक्रारी आलेल्या आहेत.धार्मिक कार्य सुरु असताना देखील नागरिकांना तृतीयपंथीयां च्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. त्यामुळे या कार्यक्रमाना तृतीयपंथीयांनी जबरदस्तीने उपस्थित राहून कोणत्याही प्रकारची मागणी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading