महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन1
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ.जेहलम जोशी यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्ताने महिला शिक्षणा बरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात,सत्यशोधक विचार व शेतकरी, मजूर,गोरगरीब लोक यांना समानतेचे आणि सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी पुढच्याही काळामध्ये खूप गरज आहे.महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांमधून दुज्याभावाच्या विरोधा मध्ये स्त्रियांचे अधिकार म्हणजेच मानव अधिकार आणि मानव अधिकार म्हणजे स्त्रियांचे अधिकार ही मुहूर्तमेढ किंवा हा जो विचार अलीकडच्या काळात जागतिकस्तरावरती सर्व देशांनी स्वीकारलेला आहे, त्याचं बीज जे आहे ते भारतामध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी रोवलेले आहे. मानवता वादी विचाराचं रूप महाराष्ट्र,भारताबरोबर संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा काम ज्या विचारवंतांनी केलं त्याच्यामध्ये महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अभूतपूर्व असं योगदान आहे.
महात्मा फुलेंनी भिडे वाड्यामध्ये जी शाळा सुरू केली होती त्याचेदेखील जतन करण्याचा निर्णय सरकार मधल्या सर्व प्रतिनिधींनी घेतलेला आहे.मुलींच्या शिक्षणाला चालना द्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि विशेषतः उच्च आणि तंत्रशिक्षण ज्या मुली घेत आहेत त्यापैकी आठ लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांच्यासाठी पूर्णपणे फी माफी करण्यात आलेली आहे.या पार्श्वभूमीवर अजून असंच कार्य समृद्ध होण्यासाठी काम व्हावं, बालविवाह सारखे प्रश्न कायमचे संपावेत यासाठी म्हणून मी महात्मा ज्योतिराव फुले यांना शतशः अभिवादन करते, असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------