धक्कादायक! पुण्यात डमी विद्यार्थी म्हणून बसण्यासाठी ठरला होता पाच लाख रुपयांचा व्यवहार
महेश दांडगे, विठ्ठल जारवाल व जनक सिसोदे हे तिघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्यातूनच त्यांनी लेखी परीक्षा पास करून देण्यासाठी आर्थिक व्यवहार ठरवला होता. जनक सिसोदे याने यासाठी मध्यस्थी केली होती. त्याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स येथे योगेश कौतिकराव गवळी या तरुणाच्या जागेवर बाळासाहेब भीमराव गवळी (रा. धावडा, भोकरदन, जि. जालना) हा परीक्षा देताना आढळून आला. तसंच, या तरुणाला परीक्षा देण्यासाठी मदत करणारा सूरज भोपळावत (रा. सांजखेडा, औरंगाबाद) यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. भिमराव गवळी याचे बीएस्सी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिघे आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. त्यातूनच भिमराव हा कौतिकराव याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी तयार झाला होता. तर भोपळावत हा त्यांना मदतीसाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट आहे का, याची पोलीस तपासणी करत आहेत.