Navratri 2021: पंतप्रधान मोदी नवरात्रौत्सवात सहभागी, उत्तम आरोग्य-समृद्धीसाठी केली प्रार्थना


हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा
  • ‘नवरात्र सर्वांच्या जीवनात शक्ती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’
  • १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्यासहीत नवरात्रौत्सवाची सांगता होणार

नवी दिल्ली : आज घटस्थापनेपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झालीय. याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेतत. ‘नवरात्र सर्वांच्या जीवनात शक्ती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’ अशी प्रार्थना नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर केलीय.

दुर्गा मातेची पूजा-अर्चना करताना एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधानांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

Lakhimpur Violence: मुलावर हत्येचा आरोप, केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट
Rahul Gandhi: ‘पत्रकार ज्या पद्धतीनं विरोधकांना प्रश्न विचारतात ते लोकशाहीत नाही हुकूमशाहीत विचारले जातात’
दुसऱ्या एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैलपुत्री देवीच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहेत. ‘नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे. आपण शैलपुत्री देवीची प्रार्थना करतो. ही देवीला समर्पित केली जाणारी एक स्तुती’ असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलंय.

दुर्गामातेच्या उपासनेचा पवित्र सण नवरात्रीला आज घटस्थापनेपासून प्रारंभ होतोय. वर्षभरात दोन वेळा नवरात्री साजरी केली जाते. पहिल्यांदा चैत्र नवरात्र आणि दुसऱ्यांदा शारदीय नवरात्र. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामातेच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. तसंच दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक भक्त उपासही करतात.

आजपासून सुरू झालेला नवरात्रौत्सव येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. यंदा तृतीया आणि चतुर्थीची तिथी एकत्र आल्यानं नवरात्र आठ दिवस साजरी होणार आहे. म्हणजेच, १५ ऑक्टोबर रोजी दसरा अर्थात विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे.

VIDEO: लखीमपूर हिंसाचाराचा आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ समोर, ‘मंत्रीपुत्राचा’ही उल्लेख
lakhimpur kheri video viral : किंकाळ्या, पळापळ आणि गोंधळ… लखीमपूर हिंसाचाराचा नवा थरारक व्हिडिओ व्हायरलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: