मुलीचं भविष्य करा सुरक्षित अन् व्हा निश्चिंत ; कन्यादानावेळी मिळतील २७ लाख, जाणून घ्या काय आहे योजना


हायलाइट्स:

  • प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे असे वाटते, पण त्यासाठी खूप पैसेही लागतात.
  • जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल चिंतित असाल आणि तिच्या लग्नासाठी पैसे बचत करु शकता.
  • एलआयसीची कन्यादान पॉलिसी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

नवी दिल्ली : भारतासारख्या देशात मुलीचं लग्न करणे, हा खूप खास प्रसंग असतो. प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे असे वाटते, पण त्यासाठी खूप पैसेही लागतात. जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल चिंतित असाल आणि तिच्या लग्नासाठी पैसे साठवू इच्छित असाल, तर एलआयसीची कन्यादान पॉलिसी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.

होम लोन झालं स्वस्त; बजाज हाउसिंग फायनान्सची व्याजदर कपात,आता ‘या’ दराने मिळेल कर्ज
जर तुम्ही दररोज फक्त १३० रुपये वाचवले, तर तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुमच्याकडे २७ लाख रुपये जमा होतील. जर तुम्हाला जास्त पैसे जमा करायचे असतील, तर तुम्ही दरमहा गुंतवणूक वाढवू शकता. त्याचबरोबर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट देखील मिळते.

दरवाढीचा भडका ; १२ दिवसांत डिझेल ३.१५ रुपयांनी महागले, पेट्रोलमध्ये झाली इतकी वाढ
काय आहे कन्यादान योजना?
भारतात जेव्हा एखादा वडील आपल्या मुलीचे लग्न करत असतो, तेव्हा तो व्यक्ती कन्यादान करत असतो. हेच लक्षात घेत एलआयसी (LIC)ने या पॉलिसीला कन्यादान असे नाव दिले आहे, जेणेकरून मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करता येतील. विम्याची तुलना करण्यास आणि एजंटसारखा विमा मिळवण्यात मदत करणाऱ्या पॉलिसी बाजार या वेबसाइटनुसार, हा काही ठराविक प्लॅन नाही. तर एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीचा कस्टमाइज प्लॅन आहे. एलआयसीच्या वेबसाईटवरही, तुम्हाला एलआयसी कन्यादान पॉलिसीच्या नावाने कोणतीही योजना सापडणार नाही, पण कंपनीचे एजंट मुलीचे लग्न लक्षात घेऊन एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी ही कन्यादान पॉलिसीच्या नावाने विकतात.

चर्चा तर होणारच! राकेश झुनझुनवालांनी घेतली पीएम मोदींची भेट, अर्थमंत्र्यांशी केली चर्चा, नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या
काय आहेत फायदे?
एलआयसीची कन्यादान पॉलिसी २५ वर्षांची असून यामध्ये शेवटच्या तीन वर्षांत कोणतेही प्रीमियम भरायचे नाही. एवढेच नाही, तर वडिलांचा किंवा पालकाचा कोणत्याही कारणामुळे अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची एकरकमी रक्कम तसेच प्रीमियम पेमेंटमध्ये सूट उपलब्ध आहे. जर मृत्यू साध्या कारणांमुळे झाला असेल, तर ५ लाख रुपयांची एकरकमी रक्कम उपलब्ध करून दिली जाते आणि नंतर दरवर्षी ५०,००० रुपये दिले जातात. तसेच मॅच्यु्रिटीनंतर पूर्ण पैसे दिले जातात.

शेअरधारकांचा विरोध ठरणार निर्णायक; अधिकाऱ्यांची वेतनवाढ कंपन्यांसाठी होणार कठीण
ही पॉलिसी कोण घेऊ शकतं?
एलआयसीची कन्यादान पॉलिसी फक्त वडील घेऊ शकतात, ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ५० वर्षांपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर मुलीचे वय किमान १ वर्ष असावे. ही पॉलिसी मिळवण्यासाठी तुम्हाला एलआयसी एजंटशी बोलावे लागेल, जेणेकरून तो एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी कस्टमाइज (सानुकुलित) करून तुम्हाला देऊ शकेल. पॉलिसी घेताना, तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, मुलीचा जन्म दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे दाखवणे आवश्यक आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: