कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यां वर सोलापूर युवक काँग्रेस कडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी ठिय्या आंदोलन

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांवर सोलापूर युवक काँग्रेसकडून गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०९/२०२४- खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर युवक काँग्रेसवतीने कॉंग्रेस नेते,लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू ,राज्यसभा खासदार अनिल बोंडे,आमदार संजय गायकवाड,दिल्लीचे माजी आमदार तरवींदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलीसांनी जबाब नोंदवून घेतला.

गांधी कुटुंबियाने देशासाठी त्याग केला आहे व बलिदान दिले आहे.देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी,इंदिरा गांधी,राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत .आता पुन्हा गांधी संपवण्याची भाषा केली जात आहे.आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली.त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जबाब नोंदवून घेतला.

यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद भोसले,प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर,सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला , शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, प्रवक्ते दाऊद नदाफ, शरद गुमटे, महेंद्र शिंदे ,धीरज खंदारे ,सुशीलकुमार म्हेत्रे, विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल,आकाश जांभळे,अजिंक्य पाटील, श्रीनिवास परकीपंडला, सुनील सारंगी, उमेर बेनोशिरुर, चंद्रकांत नाईक,श्रीनिवास परकीपंडला,अजय जाधव,शाहू सलगर, अक्षय दिल्लीवाले, यासीन शेख,सूरज शिंदे, युवराज दोडमनी,सूरज कांबळे आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading