‘…अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू’, शरद पवारांचे सोलापूरात मोठे विधान


हायलाइट्स:

  • शरद पवारांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
  • 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
  • आयकरच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौर्‍यावर आहेत. यावेळी बोलताना पवारांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे कुटुंबीय आता प्राप्तिकर, विभागाच्या रडारवर आले आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावरही पवारांनी भाजपवर टीका केली आहे.

‘मलाही ईडीने नोटीस पाठवली होती. पण त्याचं काही झालं नाही. कारण नसतानाही ईडीची नोटीस पाठवली आहे. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला आजिबात नाही. हे सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची’ टीका शरद पवारांनी केली आहे.

…अन्यथा स्वतंत्र लढू

यावेळी बोलताना, शरद पवार यांनी स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. जिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान होईल तिथेच आम्ही एकत्र अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सन्मान मिळाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढवू असं वक्तव्य पवारांनी केलं आहे. इतकंच नाहीतर आगामी निवडणुकांसाठी महिलांनी आणि तरुणांनी तयार होण्याची गरज आहे. तरुण कार्यकर्त्यांना संधी देणं महत्त्वाचं असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, ते गेल्यानंतर…; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवारांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

– तरुण कार्यकर्त्यांना संधी द्या
– निवडणुकीसाठी महिलांनाही तयार व्हावं
– राष्ट्रवादीचा सन्मान झालाच पाहिजे अन्यथा सोलापूर मनपा निवडणूक स्वतंत्र लढू
– शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून हत्याच केली
– शेतकर्‍याबद्दल भाजपला आस्थाच नाही
– भाजपच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक
– 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक
– महाराष्ट्रात शांततेत बंद करायचा
– सोलापुरात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न राहील
– कारण नसतानाही ईडीची नोटीस पाठवली
– पाहुण्यांची चिंता आपल्याला आजिबात नाही
– आयकरच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया
– सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची शरद पवारांची टीका

महाराष्ट्र हादरला! प्रियकरासोबत उभ्या असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, जे घडलं ते वाचून संतापालSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: