Petrol Diesel Price : मुंबईत इंधनाच्या दरांचा पुन्हा भडका, पेट्रोल शंभरी पार; वाचा आजचे भाव
हायलाइट्स:
- मुंबईत इंधनाच्या दरांचा पुन्हा भडका
- पेट्रोल शंभरी पार; वाचा आजचे भाव
- सामान्य माणसाच्या खिशाला कात्री
IOCL च्या वेबसाईटनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.८४ रुपये आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. इतकंच नाहीतर मुंबईत आज डिझेलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलची किंमत (०९ ऑक्टोबर २०२१ रोजी पेट्रोल डिझेलची किंमत)
– मुंबई पेट्रोल १०९.८३ रुपये आणि डिझेल १००.२९ रुपये प्रति लीटर
– दिल्ली पेट्रोल १०३.८४ रुपये आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लीटर
– चेन्नई पेट्रोल १०१.२७ रुपये आणि डिझेल ९६.९३ रुपये प्रति लीटर
– कोलकाता पेट्रोल १०४.५२ रुपये आणि डिझेल ९५.५८ रुपये प्रति लीटर
या राज्यांमध्ये पेट्रोल शंभरी पार…
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू -काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. खरंतर, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फरक कर आणि केंद्र आणि राज्य सरकारने लादलेल्या वाहतुकीच्या किंमतीमुळे बदलतो.