पेट्रोल-डिझेलचा भडका; मुंबईत डिझेलने गाठली शंभरी, सलग सहाव्या दिवशी दरवाढीचा झटका


हायलाइट्स:

  • आज रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली.
  • आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.
  • या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ११० रुपयांवर गेला असून डिझेलने शंभरी गाठली आहे.

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ११० रुपयांवर गेला असून डिझेलने शंभरी गाठली आहे. एक लीटर डिझेलचा भाव १००.६६ रुपये झाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या दरवाढीने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

गृह कर्ज घेताय ; सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँंकेने केली कर्ज दरात कपात
कच्च्या तेलातील महागाईच्या पार्श्वभूमीवर मागील सह दिवस कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. मागील १३ दिवसात पेट्रोलमध्ये २.५० रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात डिझेल २.९५ रुपयांनी महागले आहे.

आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.१२ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०४.१४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५३ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.८० रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.६९ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०७.७७ रुपये झाले आहे.

निविदा उघडल्या ; अखेर टाटाच ठरले एअर इंडियाचे तारणहार, इतक्या कोटींना झाला सौदा
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १००.६६ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९२.८२ रुपये आहे. चेन्नईत ९७.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९५.९३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०१.९१ रुपये असून बंगळुरात डिझेल ९८.५२ रुपये आहे.

RBI ची मोठी घोषणा; डिजीटल व्यवहारांना दिले प्रोत्साहन, ‘IMPS’ बाबत घेतला हा निर्णय
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत मर्यादित आहे. त्यामुळे इंधन दर सातत्याने वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी अमेरिकेत ब्रेंट क्रूडचा भाव ०.४४ डाॅलरने वधारून ८२.३९ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.०५ डाॅलरने वाढला आणि तो ७९.३५ डाॅलर प्रती बॅरल झाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: