जम्मु काश्मिरमध्ये दहशत वादाचा खात्मा करणारे भाजप सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मु काश्मिर मध्ये दहशतवादाचा खात्मा करणारे भाजपचेच सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे निवडुन येणारे आमदार हे भाजपलाच पाठिंबा देणार

श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.26 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मु काश्मिरमधील कलम 370 हटवुन येथे मोठी क्रांती केली आहे.कलम 370 हटल्यामुळे जम्मु काश्मिरमध्ये विकास होत आहे.उद्योग वाढलेले आहेत त्यामुळे रोजगारही वाढत आहे.मोंदीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने येथील दहशतवादाचा खात्मा करून लोकशाहीचे नंदनवन जम्मु काश्मिरमध्ये फुलविले आहे.यामुळे जम्मु काश्मिरमधील जनता निवडणुकीमध्ये उत्साहाने भाग घेवुन मतदान करीत आहे. दहशतवादाच्या भीतीवर येथील जनतेने मात केली असून जनता मोठया प्रमाणात लोकशाहीचा उत्सव असणा-या निवडणुकांमध्ये मतदान करीत आहेत. त्यामुळे दहशतवादावर मात करुन लोकशाही मजबुत करणा-या भाजपलाच जम्मु काश्मिरमधील जनता विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी करेल. जम्मु काश्मिरमध्ये भाजपचेच सरकार बहुमताने येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला.

जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 4 उमेदवार विधानसभा निवडणुक लढत आहेत.आज जम्मु काश्मिरमधील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसाठी ना. रामदास आठवले जम्मु काश्मिरचा दोन दिवसीय दौ-यावर आले आहेत.

या विधानसभा निवडणुकीत जम्मु काश्मिरच्या विधानसभेत रिपब्लिकन पक्ष आपले खाते उघडणार आहे. रिपब्लिकन पक्ष नोंदणीकृत पक्ष असल्याने काही जागांवर निवडणुक लढणे आवश्यक असल्याने जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्ष 4 जागांवर ताकदीने निवडणुक लढत आहे. उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला जाहीर पाठिंबा आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यावर हे उमेदवार भाजपलाच सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देतील अशी ग्वाही ना.रामदास आठवले यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जम्मु काश्मिरमध्ये दहशतवादाचा खात्मा करण्याचे काम केले आहे. अजुनही जम्मु काश्मिरमधील दहशतवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे.जम्मु काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.जम्मु काश्मिरला भारतात अन्य राज्यांशी जोडण्याचा भारताचा अविभाज्य घटक करण्याचा प्रयत्न येथील पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँगेस पक्षांनी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. मात्र कलम 370 हटवुन जम्मु काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिध्द केले आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

जम्मु काश्मिरच्या पहिल्या टप्प्यात मतदानात एकुण 59 टक्के मतदान झाले आणि दुस-या टप्प्यात 58 टक्के मतदान झाले आणि 1 तारखेलाही 3 टप्प्यातील मतदान हे मोठया प्रमाणात होईल. अन्य राज्यापेक्षा जम्मु काश्मिरमध्ये मोठया प्रमाणात मतदान झाले ही येथील लोकशाही मजबुत होत असल्याचे निर्देशक आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.

बारामुल्ला जिल्हयातील गुलमर्ग विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार अब्दुल अहाद आखून यांच्या जाहीर प्रचार सभेत ना.रामदास आठवले यांचे प्रमुख भाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जम्मु काश्मिरच्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षा संध्या गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे 4 उमेदवार जम्मु काश्मिर विधानसभा निवडणुकीत निवडणुक लढत आहेत. त्याचे पहिल्या टप्प्यातील पुलवामा जिल्हयातील राजपोरा विधानसभा मतदार संघात डेसी रैना या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार असून यांच्या नावाची विधानसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात चर्चा झाली. त्या निश्चित निवडुन येतील असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. त्यानंतर बारामुल्ला जिल्हयातील गुलमर्ग विधानसभा मतदार संघात अब्दुल अहाद आखून, बंदीपुरा जिल्हयात सोनावारी विधानसभा मतदार संघात मोहम्मद अब्दुल्ला खान आणि बारामुल्ला जिल्हयात बारामुल्ला विधानसभा मतदार संघात आदिल इस्लाम हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जम्मु काश्मिर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुक लढत आहेत.

केंद्र सरकारने देशभरातील 80 कोटी गरिबांना मोफत अन्न धान्य देण्याची योजना सुरु केली असुन त्याचा मोठया प्रमाणात जम्मु काश्मिरमधील गरीब जनतेला लाभ होत आहे. केन्द्र सरकार च्या प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना यासह अनेक योजनांचा जम्मु काश्मिरमधील जनतेला लाभ मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितच भाजपला जम्मु काश्मिर विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आयोजित जाहीर सभांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading