देशात निर्णय घेणारे सरकार, पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटली


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

‘देशामध्ये आताइतके निर्णयक्षमता असणारे सरकार कधीच नव्हते,’ असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एअर इंडिया‘च्या खासगीकरणासह विविध सुधारणांचे समर्थन केले. देशाच्या अवकाश क्षेत्रासाठी भारतीय अवकाश संघटनेची स्थापना मोदींच्या हस्ते करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘खाणकाम, कोळसा, संरक्षण, अवकाश क्षेत्रे खासगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आली आहेत. सरकारी क्षेत्रासाठीची धोरणे स्पष्ट असून, ज्या ठिकाणी सरकारची आवश्यकता नाही, तेथे खासगी क्षेत्राला संधी दिली जाईल. विविध क्षेत्रे खासगी क्षेत्रासाठी खुली करतानाच त्याला पूरक असे वातावरण तयार केले गेले आहे. त्यात राष्ट्रहिताला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध भागधारकांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणाचे त्यांनी उदाहरण दिले. यामध्ये सरकारची कटिबद्धता दिसून येते.

petrol diesel price hike : इंधनाचे दर का वाढले? पेट्रोलियम राज्यमंत्री म्हणाले, ‘करोनाच्या मोफत लसीसाठी पैसा कुठून येणार ‘
power crisis : देशात वीज संकट? अमित शहांची ऊर्जा आणि कोळसा मंत्र्यांसोबत बैठक
Martina Navratilova: मोदींना ‘लोकशाही नेते’ म्हणणाऱ्या अमित शहांवर प्रसिद्ध खेळाडूची टिप्पणी चर्चेत

भारताच्या क्षमतांमध्ये पूर्ण विश्वास आणि जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण कुठेही कमी नाही, हा दृष्टिकोन एकविसाव्या शतकातील सुधारणांकडे नेतो. या सुधारणा घडविताना कुठलाही अडथळा असेल, तर तो दूर करणे सरकारची जबाबदारी आहे. भारतामध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीत आत्ताच्या इतके सक्षम सरकार यापूर्वी कधीही नव्हते. अवकाश क्षेत्र आणि तंत्रज्ञानाशी संबंधित सुधारणा हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. एके काळी अवकाश क्षेत्र सरकारी क्षेत्र समजले जायचे. आमच्या सरकारने हा दृष्टिकोन बदलला.’

मोदी पुढे म्हणाले, ‘अ‌वकाश क्षेत्रातील सुधारणा खासगी क्षेत्राला परवानगी; नवनिर्मितीचे स्वातंत्र्य, सरकारची सक्षम भूमिका आणि भविष्य घडविण्यासाठी तरुणांची तयारी यावर आधारित आहेत. अवकाश क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. अवकाश क्षेत्रातील पुरवठा साखळीमध्ये भाग घेण्यासाठी काम करावे,’ असे आवाहन त्यांनी केले. सर्वांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘जी-२०’मध्ये मोदींचा ऑनलाइन सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० देशांच्या शिखर परिषदेत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. ही परिषद आज, मंगळवारी होणार असून, त्यामध्ये अफगाणिस्तानमधील स्थितीवर चर्चा होईल.परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. अफगाणिस्तानला देण्यात येणारी मदत, दहशतवादाविरोधात, सुरक्षेसाठी करण्यात येणारी मदत यांवरही चर्चा केली जाईल.

lakhimpur kheri incident : लखीमपूर प्रकरणावर भाजपचे डॅमेज कंट्रोल; दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक
Uttarakhand Elections: मंत्रीपदावर पाणी सोडत भाजप नेत्याची मुलासहीत काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’!
JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: